बाबरवस्ती जिल्हा परिषद शाळेला ISO मानांकन | ग्रामस्थ-शिक्षक समन्वयाने जि.प. शाळेचा कायापालट

0

जत,प्रतिनिधी : आयएसओ’ मानांकन म्हटले, की एखादा उद्योग-व्यवसाय डोळय़ांसमोर उभा राहतो. पण सांगली जिल्हय़ात हे मानांकन चक्क एका शाळेने मिळवले आहे,आणि ही गुणवत्तेचे मानांकन मिळवणारी शाळादेखील जिल्हा परिषदेची सरकारी आहे.सांगली जिल्ह्य़ाच्या पूर्व भागातील पांडोझरीनजीक वाडीवस्तीवर 1998 साली सुरू झालेल्या बाबरवस्ती शाळेची ही यशोगाथा आणि या यशोगाथेचे किमयागार आहेत दिलीप मारोती वाघमारे हे शिक्षक!तासगाव नजीक तुरची व मिरज येथिल विकासनगर व गायकवाड मळा येथे एका बहुशिक्षकी शाळेने ‘आयएसओ’ मानांकन मिळवल्याची वाघमारे गुरुजींच्या वाचनात आले. आणि प्रत्यक्ष शाळेला पालकांना घेवून भेट दिली याच वेळी त्यांनी आपल्या या शाळेलाही हे मानांकन मिळवण्याची जिद्द मनी बाळगली. या जिद्दीने पेटलेल्या वाघमारे गुरुजींनी आसपासच्या वाडीवस्तीवरील लोकांना एकत्र करून ही कल्पना सुरुवातीस मांडली आणि सारे ग्रामस्थच या कार्यात सहभागी झाले. या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे 40 विद्यार्थी शिक्षण घेतात. बहुतेक मुलांचे पालक शेतकरी व शेतमजूरच आहेत. ‘एक दिवस शाळेसाठी’ अशी घोषणा देऊन या साऱ्या पालकांनी शाळेसाठी मदतीचा हात पुढे केला. शाळेच्या प्रत्येक सुधारणेसाठी अगोदर श्रमदान आणि मग उरलेल्या कामासाठी निधी संकलन हे सूत्र ठरले. रोज कष्ट करावेत तेव्हा हातातोंडाची गाठ पडणाऱ्या या कष्टकरी समाजानेही या शाळेसाठी सुमारे 1 लाख 92 हजार रुपये उभे केले. गावातील आण्णासाहेब गडदे यांनी शाळेसाठी जागा मोफत दिली.संख मधील शेतकरी श्रीशैल येळदरी,डॉ.संभाजी जाधव,डॉ.भाऊसाहेब पवार,शिक्षक व पालक व ग्रामस्थ व अधिकाऱ्यांनीही मग सहकार्याचा हात पुढे केला.  बाबर वस्तीची ही शाळा दोन शिक्षकी आहे. चौथीपर्यंतचे वर्ग आणि एकच  शिक्षक, यावर वाघमारे गुरुजींनी मार्ग काढत चौथीच्या विद्यार्थ्यांमधील हुशार 16 विद्यार्थी वेगळे करत त्यातील एकेका मुलास दुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या गटावर नेमण्यात आले. शिक्षणापेक्षा स्वयं अध्ययनावर या शाळेत भर दिला जातो. अभ्यासाबरोबर परिसर अभ्यासातून ही मुले जास्तीत जास्त शिक्षण घेण्याचे काम करतात. साधे शाळे पुढची बाग देखील विविध वनस्पतींची माहिती देणारी तयार करण्यात आली आहे. ही मुले गांडूळ खत, शेती, संगणक शिक्षण आदी उपक्रमांतही सहभागी असतात. या प्रत्येक आकलनासाठी मुलांना ‘स्वाध्याय कार्ड’ देण्यात आलेले आहे. शाळेतच वृत्तपत्रांचे वाचनालय सुरु करण्यात आलेले आहे. यामध्ये दैनिकांचे वाचन तर घडतेच पण चालू विषयांवर मुलांमध्ये चर्चाही घडते.मुलांचा केवळ शैक्षणिक विकास हे उद्दिष्ट न ठेवता क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातही मुलांना प्रगत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत.मुलांना चारभितींच्या आत मिळणाऱ्या शिक्षणापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात वास्तवतेशी निगडित शिक्षण देण्याचा प्रयत्न या शाळेत होत आहे.हे मानांकन प्रदाकरताच मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.शैक्षणिक क्रांतीसाठी शाळा सज्ज झाली आहे, असा विश्वास मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांनी व्यक्त केला.शालेय समितीचे अध्यक्षा सविता बाबु मोटे,सरपंच जिजाबाई कांबळे,उपसरपंच नामदेव पुजारी व सर्व ग्रामपंचायत सदस्य,मातापालक,शिक्षक पालक,यांनी आय एस.ओ.मानांकनासाठी कष्ट घेतले.शिक्षण सभापती तम्माणगोंडा रवीपाटील,सुशिला तावशी,उपसभापती आडव्याप्पा घेरडे,मनोज जगताप व अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले. 

Rate Card

जत तालुक्यातील पहिला ISO मानाकिंत शाळा जत तालुक्यात शैक्षणिक मागासपण अजूनही कायम आहे.पुर्व भागातील अनेक शाळाची अवस्था वाईट आहे.तरीही पांडोझरीच्या जि.प.शाळेने मिळविलेले यश तालुक्यातचे नाव उंचविणारे आहे.ती तालुक्यातील पहिली ISO मानाकिंत शाळा ठरली आहे.

दुर्गम फोंड्या माळावर मुलांचा- फुलाचा – हसत खेळत शिक्षणाचा मळा फुलवणारे , सतत आपल्या शाळेविषयी एकाकी झुंज देणारे शिलेदार आहात.माझी शाळा , माझी मुलं,माझे पालक या भावनेने भारावलेले आहात.खरंच तुम्ही ग्रेट आहात.आज आपल्या शाळेला ISO दर्जा प्राप्त झाला आणि आमच्या सारख्या शिक्षण प्रेमींचा उर अभिमानाने भरून आला असल्याची भावना पंचायत.समितीच्या शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आली.

आयएसओ दर्जा प्राप्त बाबरवस्ती(पांडोझरीची)जि.प.शाळा

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.