राज्यभर गुरूजीचे आंदोलन | ग्रामीण भागातील बंहुताश शाळा बंद

0

सांगली : जुनी पेन्शन योजना लागू करावी,यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी सांगलीत सोमवारी प्राथमिक, माध्यमिक शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.राज्यभरातील बहुतांश शाळा सोमवारी बंद ठेवण्यात आल्या. कारण 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना त्याआधीची पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी शिक्षकांनी संप पुकारला आहे. मुंबईतल्या आझाद मैदानावर शिक्षकांचं आंदोलन सुरु आहे. राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आज राज्यातील शिक्षकांनी संप पुकारला आहे. शिक्षकांच्या या संपाचा जत तालुक्यात मोठा प्रभाव दिसून आला असून तालुक्यातील बंहुताश शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.जुन्या पैशांच्या मागणीसाठी शिक्षक आणि कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. संपकरी शिक्षकांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर एक मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.शिक्षकांच्या मागण्यानोव्हेंबरनंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, केंद्राप्रमाणे सातव्या वेतन आयोगातील सर्व भत्ते लागू करावेत, कंत्राटी धोरण रद्द करुन या कर्मचाऱ्यांना कायम करावे, यासारख्या दहा मागण्या मांडण्यात आल्या. आज मंत्रिमंडळाची बैठक असून याच बैठकीत हा निर्णय व्हावा अन्यथा पुन्हा आचारसंहितेचा अडसर निर्माण होईल, अशी या शिक्षकांची भावना आहे.सांगली येथील शिक्षकांच्या आंदोलनात बोलताना जिल्हा परिषद सदस्य विक्रमसिंह सांवतRate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.