डफळापूर | विधानसभेच्या कामाला लागा : आ. विलासराव जगताप |

0

जत,प्रतिनिधी : कोणत्याही अफवावर लक्ष न ठेवता विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागा,तिकिट मिळणार व मी निवडणूक लढविणार हे निश्चित आहे.असे प्रतिपादन आ.विलासराव जगताप यांनी डफळापूर ता.जत येथे कार्यकर्त्याच्या बैठकीत केले.विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आ.जगताप तालुक्यातील विविध गावातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेत आहे.सर्वत्र त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.डफळापूर जिल्हा परिषद मतदार संघातील गावात सोमवारी आ.जगताप यांनी बैठका घेतल्या.रात्री डफळापूर येथे बैठकीची सांगता झाली.आ.जगताप म्हणाले,तालुक्यात मोठ्या संख्येने झालेली विकासकामे आपला विजय निश्चित करतील,मी भाजपमधून निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे,कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका असेही आवाहन आ.जगताप यांनी केले.यावेळी जेष्ठ नेते संभाजी माळी,पाटील बंडू चव्हाण,माधवराव चव्हाण,बाजीराव चव्हाण याच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.