तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघ रिपाईला सोडावा : संजय कांबळे

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री ना. रामदासजी आठवले साहेबांच्या पत्नी व रिपाई महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ.सिमाताई आठवले 

यांनी तासगाव-कवटेमहांकाळ विधानसभा निवडणूक लढवावी,असे आवाहन सांगली जिल्हा अध्यक्ष संजयराव कांबळे यांनी केले.त्याचबरोबर महाआघाडीत ही जागा रिपाईला सोडण्यात यावी असेही कांबळे यांनी मागणी केली.

ढालेवाडी येथे भेट घेऊन तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघा बाबतीत पक्षाची भूमिका या विषयावर जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी सौ.सिमाताई आठवले यांची भेट घेऊन चर्चा केली.सांगली जिल्ह्यातील पुरग्ररस्ताना जीवनावश्यक संसार उपयोगी साहित्य वाटप करून भरीव मदत देण्यासाठी सौ.आठवले व जेष्ठ विद्रोही साहित्यिक,दलित पँथरचे संस्थापक दिवंगत राजाभाऊ ढाले यांची कन्या गाथाताई ढाले सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या.यावेळी सौ.आठवले यांनी ढालेवाडी येथे सदिच्छा भेट दिली.तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघ हा लोकनेते रामदासजी आठवले साहेबांची जन्मभूमी व कर्मभूमी असल्याने या मतदारसंघात रिपाईची वरिष्ठ कार्यकारणी,युवक आघाडी, विद्यार्थी आघाडी, महिला आघाडी, कामगार आघाडी अशा सर्व विंगचे पदाधिकारी कार्यरत आहेत.या मतदारसंघात रिपाईची कार्यकर्त्यांची मजबूत फळी कार्यरत आहे व पक्ष बांधणी मजबूत आहे.आजपर्यंत रिपाईने युती धर्म पाळून लोकसभा निवडणुकीत असेल किंवा मागील विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करून काम केले आहे.भाजपच्या उमेदवारांचे रिपाई कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे.आता कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन महायुतीच्या जागा रिपाईला सोडावी अशी आग्रही मागणी करण्यात आली.यावेळी विद्यार्थी परिषद जिल्हाध्यक्ष विजय कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष विकास कांबळे,तालुकाध्यक्ष संजय कांबळे,सरचिटणीस प्रंशात ऐदळे,शहर अध्यक्ष संजय वि.कांबळे  

आदी उपस्थित होते.

सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या रिपाई महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ.सिमाताई आठवले यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष संजय कांबळे व मान्यवर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.