तिकोंडीत गणेश मिरवणूकीवर दगडफेक

उमदी,वार्ताहर : तिकोंडी (ता.जत) येथे गणपती विसर्जन मिरवणुकीत दारू पिऊन दगडफेक करत अडथळा निर्माण करणाऱ्या चार जणाविरोधात उमदी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी की,तिकोंडी येथील गणपती विसर्जन मिरवणूक गावाबाहेर गेल्यानंतर संशयित आरोपी रामू आण्णाराय बळूर,आकाश प्रकाश बळूर, अल्लाउद्दीन लालसाब मुल्ला,आकाश शिवाजी कोरे (सर्व रा.तिकोंडी) यांनी मिरवणुकीत दगडफेक केली.त्यांनतर पळून जाताना मंडळाचे कार्यकर्ते व आमगोंडा गुरुनिंग राचगोंड यांना संशयितांना ओळखून पोलीसात फिर्याद दिली आहे.यावेळी उमदी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते,गावचे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.पुढील तपास उमदी पोलीस करत आहेत.
