डफळापूर भाजीपाला बाजारात शेतकऱ्यांवर व्यापाऱ्याची दादागिरी | राखीव जागा ठेवा : धोंडिराम चव्हाण

0

Rate Card

डफळापूर, वार्ताहर : डफळापूर ता.जत येथील आठवडा बाजारात शेतकऱ्यांचा भाजीपाला विकण्यासाठी राखीव जागा करावी अशी मागणी स्वा.शेतकरी संघटनेचे नेते धोंडिराम चव्हाण यांनी केली आहे.तसे निवेदन ग्रामपंचायतीला चव्हाण यांनी दिले आहे.

डफळापूर येथे परिसरातील बेंळूखी,मिरवाड,खलाटी,जिरग्याळ,एंकुडी,शिंगणापूर,कुडणूर आदी गावातील शेतकरी आपल्या शेतात पिकविलेला भाजीपाला विक्रीसाठी आणतात.मात्र बुवानंद दर्ग्यासमोर भरणाऱ्या बाजारात भाजीपाला व्यापारी शेतकऱ्यांना बाजारात बसू देत नाही.माझी जागा आहे, म्हणून दादागिरीची भाषा वापरतात.व्यापाऱ्यांची बाजारात मक्तेदारी बनली आहे.अनेक व्यापाऱ्यांचे चार-चार ठिकाणी जागा पकडून शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत. सांगली,कोल्हापूर मधून माल आणत अव्वाच्या सव्वा दराने विकतात.मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांनी अनेक परिस्थितीला तोंड देत पिकविलेला माल कवडीमोल दराने मागतात.त्यातून एकादा शेतकरी बाजारात बसून माल विकू लागल्यास त्याला मज्जाव करून उठविण्याचे प्रकार घडत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.ग्रामपंचायतीने बाजारात एक स्वतंत्र लाईन शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवावी अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.