येळवी | म्हैसाळ योजना महिन्यात कार्यान्वित करू | खा.संजयकाका पाटील

0

 येळवीच्या अष्टविनायक मंडळाच्या वतीने विविध मान्यवराचा गौरव

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर म्हैसाळ सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात येईल,योजनेच्या पंप हाऊसला महापुरात फटका बसला असून त्यांच्या दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. महिन्याभरात योजना सुरू होईल असे प्रतिपादन कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष खा.संजयकाका पाटील यांनी केले.
येळवी ता.जत येथील अष्टविनायक मंडळाच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध मान्यवराच्या सत्कार समारंभात खा.पाटील बोलत होते.यावेळी आ.विलासराव जगताप,जि.प.चे अध्यक्ष संग्राम देशमुख,माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,दीपक शिंदे म्हैसाळकर,जि.प.सदस्य सरदार पाटील,सुनिल पवार,संरपच विजयकुमार पोरे,अजित पाटील,उमेश सांवत,विजय ताड,मंडळाचे अध्यक्ष अविनाश पोरे,दीपक चव्हाण, संतोष पोरे,नितिन पोतदार,रंजीत घोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संरपच विजयकुमार पोरे यांना जीवनगौरव पुरस्कारांने गौरविण्यात आले.त्याशिवाय पत्रकार मारूती मदने,हभप तुकाराम महाराज,अँड.प्रभाकर जाधव व जि.प.सदस्या सौ.स्नेहलताई जाधव,शिवाजी माने,जागर फाऊंडेशनचे संस्थापक परशुराम मोरे,अनिल अंकलगी,राजकुमार धोत्रे,बाळासाहेब चव्हाण,आदी वेगवेगळ्या विभागात उल्लेखनीय काम केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
खा.पाटील पुढे म्हणाले,केंद्र शासनाने जत तालुक्यासाठी मोठा निधी दिला आहे. त्यातून विकास कामेही प्रगतीपथावर आहेत.तालुक्यातील महत्वाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी काम सुरू आहे. जत तालुक्यात माझ्याविरोधात विरोधकांनी विकारी प्रचार करून जनतेनी मला भरभरून मतदान करत माझ्यावर विश्वास ठेवला.मतदान कमी झाले म्हणून मी जतवर दुजाभाव करणार नाही.मला कुणीही येळवीला येऊ नका म्हणून सांगितलेले नाही.आ.जगताप साहेबांनी थोडा संयम राखत सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा.त्यांनी रस्ते,वीज,पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत.मतभेदही संपवू,रोप्य महोत्सव साजरा करत असलेल्या अष्टविनायक मंडळाचे कौतुक केले.येत्या महिन्याभरात येळवी तलावात म्हैसाळ योजनेतून पाणी सोडू असे आश्वासन शेवटी पाटील यांनी केले.
संरपच विजयकुमार पोरे म्हणाले,गावात सध्याही टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. तलावातील पाणी साठाही अखेरीला आहे.त्यामुळे लवकरात लवकर पाणी सोडावे,येळावीत कमी मतदान झाले म्हणून दुर्लक्ष न करता गावाच्या विकासात्मक योजनासाठी निधी द्यावा अशी मागणीही पोरे यांनी केली.
जि.प.अध्यक्ष संग्राम देशमुख, आ.विलासराव जगताप यांची भाषणे झाली.अविनाश पोरे यांनी स्वागत तर गजानन पतंगे यांनी आभार मामले.मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तगडे नियोजन केले.

येळवी ता.जत चे संरपच विजयकुमार गोरे यांचा खा.संजयकाका पाटील,आ.जग ताप,माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.