सोन्याळच्या तरूणाचा खूनच | अनैतिक संबधातून केला गेम I संशयित दोघांना अटक |

0

जत,प्रतिनिधी : सोन्याळ (ता. जत) येथील शिवाजी मोहन खरजे (वय 29) या युवकाचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न

झाले असून या खून प्रकरणी आरोपी जेटापा भुताळशिदध धुमकनाळ (वय 35, रा. कलमडी,ता. जत) व पद्मावती म्हाळापा उर्फ संजय चौगुले (वय 40,रा. बेळ्ळोंडगी) यांच्या विरोधात उमदी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपींना

अटक करून जत न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने नऊ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.सोन्याळ शिवाजी मोहन खरजे यांचा 28 ऑगष्ट रोजी उटगी बेळ्ळोंडगी

रस्त्याचे कडेला नाल्यामध्ये मृतदेह आढळून आला होता.प्रांरभी अपघाताचा गुन्हा दाखल झाला होता.मात्र संशयित असल्याने पोलीसांनी तपास केला पोलिसांच्या तपासात शिवाजी खरजे यांचे

Rate Card

बेळ्ळोंडगी येथील पद्मावती चौगुले या

महिलेशी अनैतिक संबंध असल्याने 18 ऑगष्ट रोजी तो तिला भेटण्यासाठी बेळ्ळोंडगी येथील घरी गेला असता यातील आरोपी जेटापा धुमकनाळ यांने

त्या दोघांना एकत्र पाहून चिडून शिवाजी खरजे याचा गळा दाबून खून करून संशयित आरोपीं जेटापा यांने स्वतः मृतदेह बुधवारी रात्रीचे वेळी उटगी ते बेळोडगी रस्त्याचे कडेला बिज्जरगी यांच्या शेताजवळ आणून टाकत अपघाताचा बनाव केल्याची कबुली पोलीसांना दिली आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.