गौरी-गणपतींना साश्रू नयनांनी निरोप | जतच्या प्रसिद्ध मंडळाचे सातव्या दिवशी गणेश विसर्जन

जत,प्रतिनिधी : बुद्धी आणि ज्ञानाचा अधिपती असलेल्या गणरायाला रविवार सातव्या दिवशी भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप देण्यात आला. दिवसभरामध्ये शेकडो घरगुती व सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले. मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुका जत शहरातील प्रमुख चौकातून पुढे जात होत्या.जत शहरातील अनेक प्रमुख मंडळाच्या गणेश मुर्तींचे सातव्या दिवशी विसर्जन करण्यात येते.मंगळवार पेठेतून एकापाठोपाठ एक अशा मंडळाच्या मिरवणूका जातात.यंदा रस्त्याचे कामे व खड्ड़्यामुळे गणेश मंडळांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.वाहने व वाद्यांची संख्या कमी असल्यामुळे काहीअंशी वाहतूक कोंडी आणि ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले. शहरातील वाचनालय चौकासह अनेक भागात कृत्रिम तलावात अनेक नागरिकांच्या घरगुती गणपतीचे रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते.जत शहरातील मंडळाचे विसर्जन शांततेमध्ये पार पडल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
जत शहरातील गणेश मंडळाची निघालेली मिरवणूक
