आशा गटप्रवर्तकांचा जतेत मोर्चा | शासकीय कर्मचारी,10 हजार मानधनाची मागणी |

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : आशा गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचारी यांचा दर्जा देण्यात यावा, त्यांचे मानधन दहा हजार रूपये करण्यात यावे यासाठी आज महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक युनियनने जत तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला. 

आशा स्वयंसेविकांना कामावर आधारित मोबदला धरून सद्या पंचवीससे रूपये मानधन मिळते.गटप्रवर्तकांना टी.ए.डी.ए.म्हणून मासिक आठ हजार सातशे पंचवीस रूपये मिळतात हे मानधन अत्यंत अल्प आहे.आशा गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचारी यांचा दर्जा देण्यात यावा अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. देशात काही राज्यात आशांना दहा हजार रूपये पर्यंत मानधन दिले जात आहे. ते महाराष्ट्रातही मिळावे अशी आमची मागणी आहे. या मागण्यासंदर्भात दि. 23 जानेवारी 2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री यांच्याशी सविस्तर चर्चा झाली होती.त्यानंतर दि.6 फेब्रुवारी 2019 रोजी सार्वजनिक आरोग्य मंत्री ना.एकनाथजी शिंदे  यांच्याबरोबर चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी आशा गट प्रवर्तक यांच्या मानधनात तीन पटीने वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच दि. 4 जून 2019 रोजी आशा गटप्रवर्तक यांनी मंत्रालयावर विशाल मोर्चा काढला होता. मोर्चामध्ये महाराष्ट्र गटप्रवर्तक युनियन च्या जिल्हाध्यक्ष काॅ. मिना कोळी, जिल्हा संघटक काॅ. हणमंत कोळी, सदस्य अंजू नदाफ, हेमा ईम्मनवर, वैशाली पवार, वनिता भुसनूर,ललिता जाधव, प्रमिला साबळे, आशा शिंदे, मंगल कोळी, ललिता सावंत, हर्षदा बोराडे, कांता यादव, गिरिजा कांबळे, चंद्रकला सुतार आदी  पदाधिकारी सहभागी झाले होते.

जत : विविध मागण्यासाठी आशा गटप्रवर्तक यांनी जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.