जत पुर्व भाग विषाणूजन्य साथीच्या जबड्यात

0

Rate Card

माडग्याळ,वार्ताहर : माडग्याळसह जत पुर्व भागातील अनेक गावांमध्ये विषाणूजन्य साथींच्या आजारांने थैमान घातले असून यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.परिसरातील आरोग्य सेवा मात्र कर्मचाऱ्याआभावी सलाईनवर आहेत.ग्रामपंचायतीकडून गांर्भिर्याने घेतले जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य अडचणीत आहे.माडग्याळ सह परिसरातील सर्व गावात थंडी,ताप,मलेरिया,डेंग्यू यासारख्या विषाणूजन्य आजारांचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे.सततची अंगदुखी,थंडी,ताप,यामुळे हिवताप,डेगू, मलेरिया साथीच्या रूग्णांची संख्या दिसेन् दिवस वाढू लागली आहे.आरोग्य विभागाने सतर्क होत तातडीने उपाय योजना करून साथ आटोक़्यात आणावी अशी मागणी होत आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.