जत नगरिषदेत तुफान राडा | सांवत,एडके गट हातघाईवर | शहरात तणाव

0

जत,प्रतिनिधी : जत नगरपरिषदेच्या सभागृहात स्वच्छता सभापती टिमू एडके व भाजपचे नगरसेवक उमेश सांवत यांच्या गटात तुफान हाणामारीने शहरात राडा झाला.

जत नगरपरिषदेच्या मासिक सभेत स्वच्छता सभापती ऐडके व भाजपचे नगरसेवक सांवत यांच्या जोरदार हाणामारी झाली, यामुळे शहरात दोन्हीचे कार्यकर्ते पालिकेसमोर आल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण होते.

ता.31 ऑगष्टला नगरपरिषदेची मासिक सभेचे आयोजन केले होते.मात्र काही कारणावरून ती सभा तहकूब करण्यात आली होती.ती बुधवार ता.4 ला ठेवण्यात आली होती.सभागृहात नगराध्यक्षा शुंभागी बन्नेवार,उपनगराध्यक्ष आप्पा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभागृहाचे कामकाम सुरू होताच स्वच्छता सभापती ऐडके व नगरसेवक सांवत गटात गेल्या वर्षाभरापासू सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद सभेत उमटले.कामाच्या चर्चेवरून एडके व सांवत याच्यांत वाद सुरू झाला.या वादाचे रूंपातर हाणामारीत झाले.ही बातमी सभागृहाबाहेर कळताच सांवत व एडके समर्थकांनी मोठ्या प्रमाणात नगरपरिषेदेसमोर गर्दी केली.त्यावेळी उपस्थित असलेले नगरसेवक व समाजिक कार्यक्रर्ते सदाम आत्तार,भाजपचे शहरध्यक्ष आण्णा भिसे,राहुल काळे आदीने प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.पण दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने एकमेकाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार झाला.कार्यालयाखाली पुन्हा उमेश सांवत, त्याचे बंन्धू महेश सांवत, टिमू एडके यांच्यात पुन्हा हाणामारी झाली.हाणामारी सोडविण्यासाठी गेलेेले आण्णा भिसे,राष्ट्रवादीचे गट नेते स्वप्निल शिंदे यांना किरकोळ मार लागल्याने गैरसमजूतीने एकाला मारहाण करण्यात आली.तितक्यात पोलीस आल्याने जमाव पांगल्याने मोठा अनर्थ टळला.याप्रकरणामुळे काहीकाळ कार्यकार्यालयाचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते.मात्र रात्री उशिरापर्यत घटनेची कोणतीही तक्रार पोलीसात दाखल नव्हती.

Rate Card

काही दिवसापुर्वी शहरातील चिंनगीबाबा मंदिरासमोरील रोडचे सुरु असलेले काम निकृष्ठ होत असल्याच्या कारणाने भाजपच्या नगरसेवकांनी बंद पाडले होते.या कारणावरून गेल्या काही दिवसात सांवत व एडके गटात तणाव वाढला होता.त्यांचे पर्यावसऩ नगरपरिषद सभागृहात झाल्याची चर्चा होती.रात्री उशिरापर्यत शहरात तणावाचे वातावरण होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.