जत | अजिंक्यताराचे “आदर्श शिक्षक पुरस्कार”जाहीर | गुरुमुर्ती ऐनापुरे यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार |

जत,प्रतिनिधी : जत येथील अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे शिक्षक दिनाचे औचित्य साधत डी.वाय.पाटील,आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आले.यावेळी सुवर्ण महोत्सवी दि.फ्रेडस् असोसिएशनचे संस्थापक/अध्यक्ष,आदर्श व्यक्तित्व गुरूमुर्ती ऐनापुरे यांना महत्वाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.
जतच्या अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानच्या वतीने अँड.प्रभाकर जाधव यांच्या पुढाकाराने दरवर्षी जत तालुक्यातील आदर्श शिक्षकांना ज्ञानदेव आदर्श शिक्षक पुरस्कारांने गौरविण्यात येत होते.पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे.यावर्षी या पुरस्काराचे नाव बदलत डी.वाय.पाटील आदर्श पुरस्कार असे करण्यात आले आहे.5 संप्टेबर शिक्षक दिनी पुरस्कार जाहीर करण्यात येतात व नोव्हेंबर महिन्यात त्यांचे विशेष कार्यक्रमात वितरण करण्यात येते.तालुक्यात आदर्श शाळा व विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना या पुरस्कारांने गौरविण्यात येते.
यंदाचे आदर्श पुरस्कार असे,
प्राथमिक विभाग :
संभाजी कोडक(जि.प.शाळा,न.1जत)
भगवान नाईक(जि.प.शाळा शिवाजीनगर,कुंभारी),सौ.आशा नारायण गोडसे(नरळे)जि.प.शाळा देवनाळ
क्रिडा विभाग : शिक्षक प्रल्हाद गौडाप्पा बिराजदार(हनुमान प्राथ.व माध्य.आश्रमशाळा लमाणतांडा)
अंगणवाडी विभाग : सौ.योजना महादेव पुजारी,सौ.फुलाबाई नामदेव चव्हाण (प्रगती बालमंदिर पांडोझरी)
माध्यमिक विभाग : आर.डी.पाटील(एस्आरव्हीएम हायस्कूल जत),एस.जी.हिरेमठ(गुरू बाळेश्वर विद्यामंदिर,गुड्डापूर),बुध्दास सुर्वे (न्यू इंग्लिश स्कूल, धावडवाडी)
उच्च माध्यमिक विभाग :पांडुरंग सांवत(आर.आर.कॉलेज,जत)
विद्यालय विभाग : डॉ.संजय लठ्ठे (आर.आर.कॉलेज,जत)
आदर्श शैक्षणिक परिसर :सिध्दनाथ हायस्कूल,अंकले
विशेष पुरस्कार : सौ.सोनुले (निवासी मुक-बधिर विद्यालय, जत
या सर्व पुरस्कारांची घोषणा पुरस्कार समितीचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉ.श्रीपाद जोशी सर यांनी घोषित केली.
