जतेत गणरायाचे जल्लोषात स्वागत | ढोलताशांचा गजर,गणपती बाप्पा मोरयाचा तालुकाभर जयघोष | पावसाचेही आगमन

0

गणपती बाप्पा आले घरात !

जत,प्रतिनिधी : ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात सोमवारी जत शहरासह ग्रामीण भागात घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात लाडके गणराज विराजमान झाले़ गेल्या काही दिवसांपासून बाप्पाची आतुरतेने वाट पाहत असणारे भक्तगण सोमवारी बाप्पाच्या जयघोषात दंग झाले होते. असंख्य गणेशभक्तांनी शहरातील नवसाचा गणपती, तसेच ईच्छापूर्ती गणेश मंदिरात सकाळपासून बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गणपती उत्सवावरचा उत्साह वाढला आहे.मंगलमय गणेशाच्या आगमनाबरोबर रिमझिम पावसाचे सोमवार आगमन झालेे.त्यामुळे लांबलेल्या पावसामुळे माना टाकणारी पिके चांगली येणार आहेत. 

विशेष म्हणजे गणपती

श्रीगणेश चतुर्थीनिमित्त बाजारपेठासुध्दा फुलल्या होत्या़ सकाळपासून गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी झालेली होती़ दुसरीकडे कोणी कारमधून, तर कोणी भल्या मोठ्या ट्रकमधून बाप्पाचे आगमन करीत स्वागत केले. डोक्यावर भगवी पट्टी बांधून गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत अनेकांच्या घरोघरी बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. 

संख,वार्ताहर :मंगलमूर्ती श्री गणेशाचे सोमवारी घरोघरी आगमन होत आहे. महापुराच्या महासंकटातून सावरून लाडक्या गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी करवीर नगरी सज्ज झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात उत्सवी वातावरण आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येलाच शहरातून गणेश आगमनाच्या मिरवणुकांना सुरुवात झाल्याने गणेशोत्सवाच्या चैतन्य सोहळ्याची नांदी झाली.शहर परिसरातील अनेक तरुण मंडळांच्या गणेशमूर्तींचे रविवारी सायंकाळनंतर आगमन झाले. त्यामुळे शहरात मिरवणुका तसेच गणेशमूर्ती नेण्याचे काम सुरू होते. शाळा, महाविद्यालये तसेच अनेक संस्थांमधूनही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो.पावसाची रिमझिम आणि गारवा असूनही शहरात खरेदीसाठी बाजारपेठातून गर्दी होती.लाडक्या बाप्पांच्या पूजेसाठी नारळ, हार, पेढे, फळे, चिरमुरे, रुमाल, उदबत्ती, खाऊची पाने, सुपारी, दुर्वा, फुले अशा पूजेच्या साहित्यांची खरेदी केली जात होती. घरोघरी आरास करण्याचे काम सुरू होते. घरातील महिलांची बाप्पांच्या नैवेद्याची तयारी सुरू झाली होती. 

मंडळाचे पारपांरिक वाद्याच्या गजरात गणपती बापाचे आगमन झा ले.त्यामुळे डॉ लंबी मुक्त पोलीसांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद लाभ ल

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.