जत | तालुक्याच्या सर्वागिंन विकासासाठी विधानसभेच्या आखाड्यात | विक्रम ढोणे |

0
Rate Card

विक्रम ढोणे  : कार्यकर्त्याचा मेळाव्यात घोषणा

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील सर्वागिंन विकास,सक्षम प्रशासन,आपल्या हक्काचा आमदार असावा म्हणून जनतेच्या हितासाठी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे प्रतिपादन युवा नेते विक्रम ढोणे यांनी केले.

तालुक्यातील विविध गावचे युवक,जेष्ठ नागरिक व विक्रम ढोणे समर्थकांचा  रविवार दि.1 सप्टेंबर रोजी सोनाई हाॅलमध्ये मेळावा संपन्न झाला.यावेळी मेळाव्यात सहभागी युवकांनी विधानसभा लढवावी,असा आग्रह धरला,सर्वांच्या वतीने विकासशील जत निर्माण करण्यासाठी तुमच्यासारख्या सक्रीय माणसाची गरज असल्याची मते मांडली, त्यामुळे तालुक्यातील युवकांच्या आग्रहाखातर विधानसभा निवडणुक लढविणारच असल्याचे ढोणे यांनी जाहीर केले.मेळाव्याला तूफान प्रतिसाद लाभला.जत तालुक्यातील कुडणूर पासून गिरगाव व खैराव पासून सिंदूर पर्यत गावातील अनेक तरूण,जेष्ठ नागरिक या मेळाव्याला उपस्थित होते.

ढोणे पुढे म्हणाले,आपला तालुका विस्ताराने मोठा व कायम दुष्काळी तालुका असुनही या तालुक्यातील प्रस्थापित नेते मंडळीच्या राजकीय इच्छाशक्ती अभावी तालुका विकासापासुन दूर आहे.तालुक्यातील नेते मंडळीनी जिल्हातील नेते मंडळीचे मांडलिकत्व स्विकारले आहे.त्यामुळे तालुक्यातील प्रस्थापित नेते या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात आपल्या तालुक्यासाठी संघर्ष करू शकत नाहीत. याचाच गैरफायदा जिल्हातील नेत्यांनी जतचा सोयीस्कर वापर करत ऊसतोड कामगार पुरवणारा तालुका म्हणून दुर्लक्षित ठेवले आहे.आता ही ओळख पुसण्यासाठी वेळ आहे,त्यामुळे लढायचे आहे.

तालुक्यात चालू असलेले जातीपातीचे राजकारण बंद करून इथल्या मातीच्या प्रश्नांसाठी एका विचाराने लढायचा असा निर्धार तालुक्यातील युवकांनी केला आहे.म्हणून मला मोठा प्रतिसाद लाभत आहे.

ढोणे म्हणाले,तालुक्यातील युवकांच्या बरोजगाराची समस्या मोठी आहे.  तालुक्यातील एकही रोजगाराचे केंद्र नाही. शेतीपुरक उद्योग निर्माण करून तालुक्यातील स्थलांतर कायम स्वरूपी थांबवण्यासाठी माझ्याकेड दीर्घकालीन योजना आहे.त्यावर काम करायचे आहे.

तालुक्याला दुरदृष्टीने रचनात्मक, धोरणात्मक दिशा ठरवण्यासाठीच ही निवडणूक युवकांनी हातात घ्यायची ठरवली आहे.त्यांच्या ताकतीवर मी विधासभेच्या मैदानात उतरलो आहे.सर्वांनी ताकतीने मला साथ द्यावी असे आवाहनही शेवटी ढोणे यांनी केले.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.