जत नगरपरिषद | शहरात दुषित पाणी पुरवठा,गटारी रस्त्यावर | सत्ताधारी नगरसेवकांचा सभेवर बहिष्कार

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : जत शहरात नगरपरिषदेकडून प्रभाग क्रमांक 2 मधील शिर्के गल्ली,दत्त कॉलनी मध्ये अनियमित तेही आठ दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत आहे.त्यातही गटारीचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी मिसळून पाणी येत आहे. त्याशिवाय विजापूर-गुहागर मार्गावरील गटारी तुंबून पाणी रस्त्यावरून लोकवस्तीत जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यांची नगरपरिषदेला वारवांर कल्पना देऊनही समस्या सुटत नसल्याने या प्रभाग मधील सत्ताधारी कॉग्रेसच्या नगरसेविका सौ.गायत्रीदेवी शिंदे व संतोष कोळी संतप्त झाले असून, समस्या सुटेपर्यत नगरपरिषदेच्या सर्व सभावर बहिष्कार टाकत असल्याचे त्यांनी निवेदन दिले आहे.

जत शहरात पाणी पुरवठ्याचा फज्जा उडाला आहे.शहरात येणारे आड दिवसाआड पाणी दुषित,दुर्गंधीयुक्त येत आहे.त्याचबरोबर अनेक गटारी तुंबल्याने गटारीचे पाणी पाईपलाईनमध्ये व लोकवस्तीत जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुर्गंधीने शहरात डांसाचे तूफान तयार झाले आहे.

त्यामुळे नागरिक संप्तत झाले असताना आमच्या प्रभागातील समस्या नगरपरिषद प्रशासनाला सांगूनही सुटत नसल्याने सत्ताधारी नगरसेवक आक्रमक झाले आहेत.त्यांनी थेट बहिष्कार टाकत निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की,प्रभाग क्रमांक 2 मधील शिर्के गल्ली,दत्त कॉलनी मध्ये नागरिकांना वेळेत पाणी पुरवठा होत नाही,आठ दिवसाआड येत असलेले पाणीही दुषित येत आहे.गटरीचे पाणी,पाणी पुरवठा पाईपलाईन मध्ये मिसळत असून लोकांना तेच पाणी वापरावे लागत आहे.या प्रभागातील बहुसंख्य नागरीक दुषित पाण्यामुळे आजारी पडले आहेत.यास सर्वस्वी जबाबदार जत नगरपरिषद आहे.सातारा-गुहागर महामार्गावर असणारी गटरी तुंबून त्याचे पाणी रस्त्यावर येत आहे.या सर्व गंभीर गोष्टीकडे नगरपरिषद प्रशासनाला

वेळोवेळी सूचना केल्या,प्रत्यक्ष परिस्थिती दाखवली पण त्याचा काही उपयोग झाला नाही.या सर्व गंभीर गोष्टीकडे नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करत असलेने आम्ही या प्रभागातील नगरसेवक हे काम होई पर्यंत नगरपरिषद सभेवर बहिष्कार घालत आहोत.

जत शहरातील विजापूर-गुहागर रस्त्यावरून वाहणारे गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.