जत | गणेशोत्सव वर्गणीच्या नावावर पैसे मागणाऱ्या तिघावर गुन्हा |

जत,प्रतिनिधी :जत शहरातील व्यापारी ओमप्रकाश जयरूपरामजी चौधरी यांना गणेशोत्सवाच्या वर्गणीच्या नावावर पैसे मागल्याप्रकरणी जत मधील गौतम ऐवळेेसह अनओळखी तिघाविरोधात जत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसानी दिलेली माहिती अशी,मार्केट यार्ड मधील गाळा नं.31 मध्ये मुळ राजस्थान मधील ओमप्रकाश चौधरी यांचे शेतीच्या मोटारीचे साहित्य विक्रीचे दुकान आहे.त्यांना ता.29 रोजी संशयित गौतम ऐवळे व अन्य अनओळखी तिघांनी गणपतीची वर्गणी दे म्हणून 1500 रूपयाची वर्गणीची पावती दिली.चौधरी यांनी व्यवसायात मंदी आहे.शंभर रूपये देतो म्हणून सांगितले. मात्र कांबळे यांनी ऐवढे पैसे द्यावेच लागतील म्हणून सांगितले.पुन्हा ता.30 रोजी गोतम ऐवळे अन्य तिघे जण दुकानात आले.त्यांनी वर्गणी दे म्हणत ओमप्रकाश यांचा भाऊ रमेश यांना पैसे मागू लागला त्यांनी नकार दिला,त्यावेळी ऐवळे व अन्य अनओळखी मोठ्या आवाजात शिवीगाळ करत तिघांनी दुकानात घुसत रमेश याला मारहाण केली.लगतच्या व्यापाऱ्यांनी भांडणे सोडविली.तरीही कांबळे व अन्य तिघांनी वर्गणी द्यावीच लागेल अन्यथा जतमध्ये धंदा कसा करतोस बघता म्हणून धमकी दिल्याची फिर्याद ओमप्रकाश यांनी दिली.त्यावरून गौतम ऐवळेसह अन्य अनओळखी तिघाविरोधात पोलीसांनी 384,386,452,143,147,149 अंतर्गत खंडणी,दमदाटी आदी गुन्ह्याखाली गुन्हे दाखल केला आहे. दरम्यान जत व्यापारी असोसिएशनच्या सदस्यांनी पोलीस ठाण्यासमोर गर्दी करत एकजूटीची ताकत दाखविली होती.दोन दिवसापुर्वी त्यांनी पोलीसांना निवेदन दिले होते.
खंडणीचाच गुन्हा
गणेशोत्सवाच्या नावावर कोन धमकावून त्रास देत असेलतर त्यांनी पोलीसांशी संपर्क करावा.कोणत्याही प्रकारे असे प्रकाराला पाठिशी घातले जाणार नाही.खंडणी,दहशत आदी गुन्हे दाखल करू,असे पोलिस निरिक्षक शिवाजी गायकवाड यांनी सांगितले.
