जत | शहर सिसीटिव्हीच्या कक्षेत | कँमेरेच्या यंत्रणेचे उद्घाटन | प्रत्येक घटना ठाण्यात रेकार्ड होणार |
जत,प्रतिनिधी : जत शहर आता सीसीटिव्ही कमेरेच्या कवेत आले असून जत पोलीसाची यापुढे सिसिटिव्ही कँमेरेच्या माध्यमातून तिसऱ्या डोळ्याद्वारे शहरावर नजर राहणार आहे. या सीसीटिव्ही कँमेराचे उद्घाटन अप्पर अधिक्षक मनिषा दुबुले यांच्याहस्ते झाले.
जत पोलीस ठाणे हद्दीतील शहरात वारंवार होणाऱ्या चोऱ्या व अन्य गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जत शहरात सीसीटीव्ही बसविण्याची गरज होती. पोलीसांनी याबाबत केलेल्या अवाहनास जत शहरातील व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.त्यांनी दिलेल्या कँमेऱ्याच्या माध्यमातून शहरातील महत्वाच्या असणाऱ्या गांधी चौक,मंगळवार पेठ परिसरात एकूण 12 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांचे थेट प्रक्षेपण जत पोलीस ठाणेमध्ये होत आहे.त्यामळे जत शहरात होत असणाऱ्या गैरवर्तन व घरोफोडी, चोऱ्यांवर जत पोलीसांची पोलीस ठाणेतून 24 तास नजर राहणार आहे.कायदा सुव्यवस्था बिघडविणारे व चोऱ्यावर नियंत्रण राखण्यात पोलीसांना यामुळे यश येणार आहे.
जत दौऱ्यावर असलेल्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती दुबुले यांच्या हस्ते कँमेरे प्रक्षेपनाची सुरूवात करण्यात आली.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल माने,जत शहरातील व्यापारी,पदाधिकारी व
नागरिक उपस्थित होते.
या सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी सहकार्य करणाऱ्या व्यापारी व पदाधिकारी यांचा अप्पर पोलीस श्रीमती दुबुले यांनी आभार मानले.

गणेश उत्सव काळात अनावश्यक खर्चास फाटा देवून जत शहरात सर्व चौक,सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असे आवाहन दुबुले यैंनी केले.
शहरावर आता आमची नजरजत शहरातील प्रमुख चौकात प्रांरभी 12 सिसिटिव्ही कँमेरे बसविण्यात आले आहेत.त्याचे थेट प्रक्षेपण ठाण्यातील एलईडीवर होत आहे. यापुढच्या टप्यात शहरातील सर्व चौक व सार्वजनिक ठिकाणी असे कँमेरे बसविण्यात येणार आहेत. यामुळे जत शहरावर 24 तास पोलीसाची नजर राहणार आहे.घरफोडी,चोऱ्यासह,अन्य गुन्ह्यांना पायबंद बसणार आहे.संशास्पद प्रक्षेपण होताच आमचे पोलीस तेथे तात्काळ पोहचतील.अनिल माने,सा.पोलीस निरिक्षक,जत
x
