| एक गाव एक गणपती बसवा ; अप्पर अधिक्षक मनिषा दुबुले | जतेत शांतता कमिटीची बैठक संपन्न |

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील दुष्काळ व  जिल्ह्यातील पूराच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळानी एक गाव एक गणपती बसवावा,गणेशोत्सवात कायदा,संस्कृती व धार्मिक प्रदूषण न करता शांततेत गणेशोत्सव साजरा करा,गणेशोत्सव काळात अनावश्यक खर्च टाळून ते पैसे सतकृमी असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले यांनी केले.

जत विभागीय पोलीस कार्यालयाच्या वतीने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव व मोहरम 2019 ची शांतता कमिटीची बैठकीत दुबुले बोलत होत्या.यावेळी प्रांताधिकारी तुषार ठोंबरे, डिवायएसपी दिलीप जगदाळे,तहसीलदार सचिन पाटील,सा.पोलीस निरिक्षक अनिल माने,मुख्याधिकारी अभिजित हराळे,माजी सभापती प्रकाश जमदाडे,मिनाक्षी अक्की,शहरातील सर्व पदाधिकारी, गणेश मंडळाचे अध्यक्ष, पोलीस पाटील, व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

Rate Card

दुबुले पुढे म्हणाल्या, गणेशोत्सव काळात जुन्या खेळाच्या स्पर्धा भरवून ग्रामीण भागातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहण्यासाठी मदत होईल.पाश्चात संस्कृतीचे अनुकरण करून पिड्या बाद करू नका,गणेशोत्सव व मोहरम हिंदू-मुस्लिम ऐक्यातून धार्मिकता संपवा.डिजे,डॉल्बी ला फाटा देत समाजाला पुढे घेऊन जाणारे व्याख्याते आणा व समाजात परिवर्तन घडवा.गत काही काळात डॉल्बी,संस्कृती,नैतिकतेत प्रदूषण झाले आहे. धार्मिकेत वेगवेगळ्या गोष्टीत प्रदूषण झाले,ते टाळणे गरजेचे आहे.पारपांरिक खेळ,लेझिम,फुगडी,कब्बड्डी,खो-खो,हळदीकुंकू असे कार्यक्रमाचे आयोजन करून चांगला गणपती उत्सव साजरा करा. गणपती बुध्दी,कला,विघ्नहर्ता,सुखकर्ता असतानाही तो येताना भिती का वाटते यांचे आकलन करणे गरजेचे आहे. दुसऱ्याच्या भावनाना ठेच पोहचेल असे कृत्य करू नका असे आवाहन शेवटी दुबुले यांनी केले.

जत येथील शांतता कमिटीच्या बैठकीत बोलताना अप्पर अधिक्षक मनीषा दुबुले

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.