डफळापूर | राजे विजयसिंह डफळे विद्यालयात श्रावण विशेष कार्यक्रम |

0

डफळापूर, वार्ताहर : येथील राजे विजयसिंह डफळापूर हायस्कूल व ज्यू.कॉलेज येथे श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न झाला.

Rate Card

विद्यालयाचे प्राचार्य श्री.जि.एम.अपराज अध्यक्षस्थानी होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून संकेत टाइम्सचे संपादक राजू माळी,श्री.मसणे सर उपस्थित होते.

यावेळी श्रावण महिन्यातील पारपांरिक गिते,उत्सव,व ऐतिहासिक  महत्व यांची माहिती विद्यार्थांनी सादर केले.

श्री.अपराज सर म्हणाले,हिंदू संस्कृत्तीत श्रावण महिन्याचे मोठे महत्व आहे.श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा/सणांचा राजा म्हटले जाते.श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू परंपरा आहे. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेतला श्रावण महिना हा 23 जुले ते 22 ऑगस्ट या तारखांदरम्यान असतो.सर्वाधिक उत्सव, सण असलेल्या या महिन्यात धार्मिक कार्यक्रमाची घरोघरी रेलचल असते.

सुत्र संचालन श्रध्दा अनुशे,सुर्ती रायबागे या विद्यार्थीनीनी केले.कार्यक्रमाचे नियोजन प्रा.अनिल पाटील,एम.आर.बन्नी,श्री.चौधरी,श्री.कोळेकर,आटपाडकर,सौ.पवार,शेस्वरे यांनी नियोजन केले.

राजे विजय विद्यालयात श्रावण विशेष कार्यक्रम बोलताना प्रा.अनिल पाटील

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.