जाड्डरबोबलाद | जि प.चे.सभापती तम्मनगौडा रवीपाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छाचां वर्षाव |
जत,प्रतिनिधी: जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती तम्माणगौडा रवीपाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाचां वर्षाव करण्यात आला.तालुक्यातील विविध ठिकाणी वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रम राबविण्यात आले.रवीवारी जाड्डरबोबलाद या रवीपाटील यांच्या गावी सकाळ पासून राजकीय, सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटत दिर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.जाड्डरबोबलाद येथे रवीवारी सायकांळी तम्मणगौडा रवीपाटील यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला.यावेळी बालगाव आश्रमाचे डॉ.अमृतानंद स्वामीजी,सोलापूरचे शिवपुत्र स्वामीजी,मिरजचे शिवदेव स्वामीजी,कात्राळचे योगानंद स्वामीजी,चिक्कलगी भूयार मठाचे तुकाराम महाराज,सोमनाथ स्वामीजी,डॉ.रविंद्र आरळी,प्रकाश जमदाडे,संजय तेली,शिवाजीराव ताड,अँड.श्रीपाद अष्टेकर,आप्पासाहेब नामद,रामाण्णा जिवण्णावर,सोमनिंग बोरामणी,शिवाप्पा तांवशी,गुरूबसव पाटील,कामाण्णा बंडगरकमळाबाई शेख,समिरभाई कुपवाडे,अशोक संकपाळ,दत्तात्रय शिंदे,हणमंत गडदे,प्रविण पाटील,भिमू सरगर,रमेश बिराजदार,बसवराज बिराजदार,महादेव कलुती,संजय चौके,रवि शिवपुरे,संगाप्पा नंदूर,विजय बगली, यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रम संपन्न झाला.सभापती तम्मणगौडा यांना भला मोठा पुष्पहार घालून जंगी शुभेच्छा देण्यात आल्या.जाड्डरबोबलाद येते रविवारी यामुळे यात्रेचे स्वरूप आले होते.
