जत | सेवानिवृत्तीनंतर शिक्षकांनी समाजासाठी योगदान द्यावे | आ.विलासराव जगताप |

0

वसंत बोराडे,प्रकाश पाटील,तानाजी बुरूटे यांचा सत्कार

Rate Card

जत,प्रतिनिधी : सेवानिवृत्त शिक्षकांनी आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा सेवानिवृत्तीनंतर लोकसेवेसाठी व समाजासाठी करावा असे प्रतिपादन आमदार विलासराव जगताप यांनी जत येथे केले.येथील श्री.रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्यनिअर कॉलेजमधील सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंत बोराडे, पर्यवेक्षक प्रकाश पाटील व सहशिक्षक तानाजी बुरुटे या शिक्षकांचा सपत्निक सत्कार समांरभाप्रसंगी ते बोलत होते. 

प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य सुनिल मोहिते यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य प्रमोद पोतनीस होते.

आमदार जगताप म्हणाले,सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्तांच्या मनात खिन्नतेची भावना वाढीस लागते.आता आपले काम संपले अशी मानसिकता त्यांची तयार होते.यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा समाजसेवेसाठी करुन द्यावा.रिटायरमेंटर नंतर खऱ्या अर्थाने त्यांनी नव्या उमेदीने लोकसेवा केली पाहिजे.शिक्षक हे भाग्यवान असतात.सेवानिवृत्तीनंतर त्यांचा निरोप समारंभ होतो.पण राजकारण्यांना सेवानिवृत्ती नाही.त्यांच्या भाग्यात निरोप समारंभ नसतो.शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रम पूर्ण न करता,विद्यार्थ्यावर चांगले संस्कार कसे होतील याकडे लक्ष दिले पाहिजे.यासाठी अभ्यासक्रमाबरोबरच अवांतर ज्ञानदान विद्यार्थ्यांना शिक्षकांनी करावे असेही आवाहन शेवटी आ.जगताप यांनी केले.

माजी प्राचार्य प्रमोद पोतनीस म्हणाले,

सेवानिवृत्त शिक्षकांनी आध्यात्म जीवनात आणावे व त्याचा उपयोग दैनंदिन जीवन जगण्यासाठी करावा. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे यांनी,सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या अनुभवाचा फायदा घेऊन विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम ठेऊन त्यात वाढ करण्याचे आवाहन केले.

यावेळी पर्यवेक्षिक सुमन सावंत,माजी मुख्याध्यापक के.डी.सुर्वे यांनी मनोगते व्यक्त केली.माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत,अँड.प्रभाकर जाधव,एन.डी.शिंदे माजी मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन संभाजी सरक यांनी तर आभार कृष्णा संकपाळ यांनी मानले.

जत येथील रामराव विद्यामंदिर हायस्कूलमधील शिक्षकांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमात बोलताना आ.विलासराव जगताप 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.