जत | पोक्सो अंतर्गत कवटेमहांकाळच्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल |

0

जत,प्रतिनिधी : जत येथील एका दहावीत शिकणाऱ्या 16 वर्षाच्या शाळकरी मुलीस वारंवार छेडखाणी करत असल्याच्या कारणावरून कवठेमहांकाळ येथील प्रदीप शिवाजी जाधव व संजय शिवाजी पवार या दोघांविरुध्द जत पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून जत पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

Rate Card

अधिक माहिती अशी,आरोपी प्रदीप जाधव हा फिर्यादी मुलीस शाळेला जात -येत असताना पाठलाग करणे, माझे तुझ्यावर प्रेम आहे.तू माझ्याशी लग्न कर असे म्हणून वारंवार त्रास देत होता.अखेर पिडित मुलीने आई-वडीलांना सांगत जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून बाल लैंगिक अत्याचार कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आधिक तपास सपोनि वर्षा डोंगरे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.