सांगली : ब्रह्मनाळ (तालुका पलूस जि. सांगली) येथे ग्रामपंचायतची बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचे मृतदेह हाती आले असून 15 जणांना वाचवण्यात यश आले आहे. आणखी 3 जणांना बुड़ाल्याची शक्यता असून 3 जण बेपत्ता आहेत. शोधकार्य सुरू आहे. NDRF TEAM घटना स्थळी पोहोचली आहे. बोटमध्ये एकूण 30 लोक होते, अशी माहिती जिल्हा प्रशासनकडून देण्यात आली.