जत | शहर बनले चिखल नगरी | सर्वच रस्ते,सार्वजनिक ठिकाणे राडेराड |

0
2

जत,प्रतिनिधी : गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे जत शहरभर चिखल झाला आहे. मुख्य रस्त्यासह उपनरातील लोक या रस्त्यामुळे घराबाहेर पडत नसल्याचे चित्र आहे.

इतकी दलदल होतानाही नगरपालिकेकडून साधा मुरूमही टाकला जात नाही.त्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त होत आहे.अगोदर खड्ड्यात गेलेले रस्ते त्यात पडत असलेल्या पावसामुळे जवळपास सर्वच रस्त्यावर डबकी,चिखल बनला आहेत.रस्तेच घसरगुंडी बनल्याने चालत जाणेही जिकिरीचे बनले आहे.शहरातील महामार्ग,मंगळवार पेठ,नगरपालिका ते शिवाजी पेठ,स्टेट बँक रोडवर व्यवस्थित चालताही येत नाही अशी स्थिती आहे. उपनगरातील रस्त्याची आवस्थेचा विचार न केलेला बरा अशी परिस्थिती आहे.मात्र समाजसुधारणेचा आव आणणाऱ्या व मोठ-मोठी आश्वासने देऊन सत्तेच्या खुर्चीत बसलेल्या लोकप्रतिनिधींना यांचे काहीही घेणेदेणे नसल्याचे चित्र आहे. तातडीने या रस्त्यावर मुरूम टाकावा अशी मागणी होत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here