जत | पंचायत समितीला पूर्ण वेळ बिडिओ मिळावा | आणासाहेब कोडग |

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कार्यरत असणाऱ्या जत पंचायत समितीच्या बिडिओ अर्चना वाघमळे यांची रत्नागिरी येथे पदोन्नती होऊन बदली झाली आहे. सध्या तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती असून चारा छावण्या व पाण्याचे टँकर चालू आहेत.जत तालुका विस्ताराने फार मोठा आहे,तालुक्यात घरकूलासह शासनाच्या अनेक योजनाची  कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत.

तालुक्यात 116 ग्रामपंचायती व अनेक वाड्यावस्त्या आहेत.विस्ताराने फार मोठा तालुका असल्याने या तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या कामासाठी जतला पूर्ण वेळ बिडिओ मिळावा अशी मागणी संरपच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग यांनी केली आहे. 

Rate Card

यापुर्वीचा इतिहास पाहता अतिरिक्त कार्यभार दिलेले बिडिओकडे पंचायत समितीचा कार्यभार राहिला आहे.आताही तसे होण्याची शक्यता आहे.अर्धवेळ बिडिओमुळे तालुक्यातील विकास कामावर मोठा परिणाम होऊ शकतो.त्यामुळे पुर्णवेळ बिडिओची नेमणूक करावी अशी मागणी आहे.तसे पत्र अखिल भारतीय सरपंच परिषेदेच्या वतीने सांगली जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.