जत | विधानसभेला भाजपने नवा उमेदवार द्यावा : डॉ.रविंद्र आरळी |

0

जत,प्रतिनिधी : कोणत्याही परिस्थितीत भाजपच्या चिन्हावर विधानसभा लढविणार असून भाजपने नव्या चेहरा असलेला उमेदवार द्यावा,अशी जनतेची मागणी असल्याचे सांगत माझ्यासह चारजण इच्छूक असल्याचे भाजपचे जेष्ठ नेते डॉ.रविंद्र आरळी यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. 

जत येथील हॉटेल सी क्वेअर येथे पत्रकार

परिषदेत डॉ.आरळी बोलत होते. 

ते म्हणाले, माझ्यासह भाजपचे जि.प. आरोग्य सभापती तमान्नगौडा रविपाटील, भाजपचे,जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव ताड, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे इच्छुक आहोत.या चारजणा पैंकी कोणालाही भाजपने उमेदवारी दिल्यास त्यांना आम्ही सर्वानी मिळून ताकतीने निवडून आणू अशी ग्वाही आरळी यांनी दिली. 

ते पुढे म्हणाले,जत तालुक्यातील लोकांना नविन चेहऱ्या असलेल्या उमेदवार हवा आहे.त्यामुळे पक्ष नविन चेहऱ्याला संधी देईल.अशी आम्हाला खात्री आहे.

Rate Card

तमन्नगौडा रवि म्हणाले की,आम्ही जत तालुक्यातील 110 गावांचा दौरा केला आहे.विद्यमान आमदारांवर जनतेची तीव्र नाराजी असल्याने आम्ही पक्षातील सर्वांची मोट बांधून एकत्र आलो आहोत.

तालुकाध्यक्ष चंद्रकात गुड्डोडगी म्हणाले, जत तालुक्यामध्ये शक्तीप्रमुख केंद्रप्रमुख,पेज प्रमुख यांचे संघटन आम्ही यावेळी मोठ्या प्रमाणात केले आहे.त्या माध्यमातून आमचे काम सुरू आहे.विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लवकरचं महामेळावा घेणार आहोत.पक्षाने आम्हाला कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी तालुक्यात भाजपचा नविन आमदार असेल असा विश्वास गुड्डोडगी यांनी व्यक्त केले. 

प्रकाश जमदाडे हे काही कामानिमित्त परगावी गेल्यामुळे दूरध्वनीवरून पत्रकार परिषदेला पाठिंबा दर्शविला असल्याचे सांगितले.यावेळी शिवाजीराव ताड,नशिर शेख, सदाशिव शिद्दरेड्डी,अल्पसंख्याचे सलिम गवंडी, मेंढीगिरीचे रवि पाटील, रणजित कांबळे,ममता तेली, रेऊर वकील व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.