हप्तेवसूलीची जबाबदारी एका पेंड विक्रेत्याकडे
जत,प्रतिनिधी : अन्नभेसळच्या एका अधिकाऱ्यांला दिल्या जाणाऱ्या चार लाख हप्तामुळे जत शहरातील नागरिकांच्या पोटाची वाट लागली आहे.काहीही विका फक्त हप्ता द्या,कोणतीही कारवाई होणार नाही,असा फतवा जत शहरातील अन्नभेसळच्या एका अधिकाऱ्यांच्या एंजटाने काढला आहे.त्यामुळे शहरात खाद्यान्नासह,धान्य दुकाने,हॉटेल,चायनीज सेंटर,स्विटमर्ट,ट
हातगाडे,बेकरी,ढाबे,दुध डेअऱ्या,फळासह खान्याच्या जवळपास सर्वच पदार्थात भयानक भेसळ करून विकले जात आहेत.सर्वत्र भेसळीच्या खाद्यान्नामुळे जतकराच्या आरोग्य धोक्यात आले आहे.असे भेसळ पदार्थ खाण्यामुळे शहरातील जवळपास सर्वच नागरिकांना पोटाच्या तक्रारी जडल्या आहेत.यांची जबाबदारी असणाऱ्या अन्नभेसळच्या जतच्या कामगिरीवर असणाऱ्या एका अधिकाऱ्यांला या सर्व दुकानदाराकडून महिन्याला सुमारे 4 लाख रूपयाचा हप्ता दिला जात असल्याची चर्चा आहे. सर्व दुकानदाराकडून महिन्याला पैसे गोळा करण्याची जबाबदारी जत शहरातील एका पेंड विक्रेत्याकडे आहे.
हेही वाचा,
जत | अन्नभेसळच्या एका अधिकाऱ्यांला 5 लाखाचा हप्ता ? |
शहरातील जवळपास सर्वच हॉटेल,किराणा दुकाने,ढाबे,चायनीज सेंटर,हातगाडे,बजार,फळविक्रेते,
हप्ते न देणाऱ्या दुकानदारावर कारवाईची धमकी या एंजटाकडून दिली जात आहे.
त्याशिवाय तालुक्यात दुधसंकलन केंद्रावर छापामारी करून मँनेज प्रकरणाची रक्कमही या पेंड विक्रेत्याकडे जमा केली जात आहे.
अन्नभेसळच्या या कारभारामुळे जत शहरातील किराणा दुकाने,फिल्टर पाणी, बजार,दुध डेअऱ्यासह खाद्यान्यात थेट विषासारखे पदार्थाची भेसळ केली जात असल्याचे वास्तव आहे.
सर्वाधिक भेसळीचे प्रतिष्ठानेशहरातील चायनीज सेंटर,वडापाव,भज्जी गाडे,हॉटेल,स्विटमार्ट,ढाब्यावर शरिराची वाट लावेल अशी भेसळ होत आहे. पदार्थ तयार करणारे कच्चा पदार्थात निम्म्याने भेसळ असते.त्यापेक्षा वाईट म्हणजे यातील पदार्थ तळण्यासाठी वापरणारे तेलाचा विचार न केलेला बरा असे असते.याकडे एकदाही अन्नभेसळच्या अधिकाऱ्यांचे लक्ष गेले नाही हे विशेष..
फिल्टर पाणी गोरखधंदाजत शहरात सुमारे 18 फिल्टर पाणी विकण्याचे प्लँट आहेत.थेट नळाचे पाणी विकण्याचे प्रकार नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचे आहेत.यातील किती जणाचे व कोणते परवाने आहेत.यावर संशोधन करण्याची गरज आहे. अन्नभेसळच्या एका अधिकाऱ्यांने कारवाई करून बंद केलेले प्लँट पुन्हा कोणते परवाने घेऊन झालेत हा संशयास्पद प्रकार आहे.सर्व महिन्याकाठीच्या मलीद्यामुळे अलबेलपणे सुरू आहे.