जत | सुसालादमध्ये 119 ब्रास वाळू जप्त | महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर मोठी कारवाई |

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील सिमावर्ती सुसलाद येथील बोर नदीतून काढलेल्या बेकायदा वाळूच्या साठ्यावर संख तहसील विभागाच्या पथकाने छापा टाकला.त्यात वेगवेगळ्या पाच साठ्यात 119 ब्रास वाळू,दोन डंपर,चाळण पथकाच्या हाती लागले आहे.ही चंद्रकांत शंकरेप्पा गुड्डोडगी रा.सुसलाद यांच्या मालकीची आहे.सुसलादपासून तीन किलोमीटर अंतरावरील कर्नाटक महाराष्ट्र राज्य सिमेवर जिगजेनी रस्त्याच्या पुर्व बाजूच्या कर्नाटक हद्दीतील रामा संगाप्पा बावची रा.जिगजेनी ता.इंडी,जि.विजापूर यांच्या सर्व्हे न.54 या जमिनीत साठा केला होता.

जत तालुक्यातील पुर्व भागात काळ्या सोन्याचे कोठार असलेल्या भोर नदीतून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. गेल्या काही दिवसापुर्वी संख अप्पर तहसील कार्यालयाकडे रूजू झालेले अनुभवी तहसीलदार प्रंशात पिसाळ यांनी वाळू तस्करी रोकण्यासाठी मोहीम उघडली आहे.गेल्या आठवड्यात एका मोठ्या वाळू तस्कराला पिसाळ यांच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.त्याचे पोकलड जप्त करून मोठा दंड ठोठावला आहे.तरीही काही राजकीय पक्षाचा आधार घेऊन मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू होती.महाराष्ट्र कर्नाटक सिमेवरील सुसलाद,सोनलगी या भागात मोठ मोठे वाळूचे ढिगारे जमा केल्याची माहिती तहसीलदार पिसाळ यांना मिळाली होती.त्यानुसार त्यांच्या पथकाने सुसलाद जवळच्या कर्नाटक हद्दीतील वाळू साठ्यावर छापा टाकला.त्यावेळी

Rate Card

कर्नाटक-महाराष्ट्र सिमेचा फायदा घेत पाच ठिकाणी वेगवेगळे साठे सापडले.त्यात 119 ब्रास बेकायदा एकत्रित केलेली वाळू जप्त केली.त्याशिवाय दोन डंपर जप्त केले आहे.याप्रकरणी अद्याप दंडाची रक्कम निश्चित केलेली नाही.मात्र दंड रक्कम कोटीवर असण्याची शक्यता आहे.

जत : कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीत पकडलेला वाळूचा मोठा साठा,डंपर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.