जत | सव्वा लाख हप्ताने मटक्याला बळ | जत,उमदी हद्दीत अवैध धंदे खुलेआम | सर्वाचे हप्ते सैट

0

पोलीस ठाणे,विभागीय पोलीस कार्यालय हद्दीत मटका बेफाम : सर्वाचे हप्ते सेट

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील जत,उमदी पोलीस ठाणे,डिवायएसपी कार्यालय,स्थानिक गुन्हे विभाग,विशेष पथके यांचे हप्ते सैट झाले असून तालुकाभर बेफाम मटका,ऑनलाइन लॉटरी, जुगार,दारूसह सर्व अवैध धंदे सुरू झाले आहेत.हप्ते न देणाऱ्या अड्ड्यावर कारवाईचे नाटक केले जात आहे. पोलीस ठाण्याला सव्वा लाख हप्ता द्या बिनधास्त मटका सुरू करा असा फतवा पोलीसांनी काढल्याची चर्चा सुरू आहे.

तालुक्यातील छुपे सुरू असलेले अवैध धंदे हप्तेखोरीने उघड्यावर सुरू झाले आहेत.पोलीस ठाण्याचे चार,विभागीय कार्यालयाचे तीन पोलीस कर्मचारी फक्त हप्ते गोळा करण्याच्या कामगिरीवर असल्याची चर्चा आहे.त्याशिवाय विशेष पथकाचे,स्थानिक बिट,पोलीस पाटील यांचेही हप्ते फिक्स झाल्याने अवैध धंद्याचा बाजार तुफान सुरू आहे. मटक्याच्या चिठ्ठ्या थेट रस्त्यावर बसून घेतल्या जात आहेत.चौकातील लोकवस्ती,स्टँड परिसरात तिन पानी जुगार अड्डे सुरू आहेत.बेकायदा वडाप,गांज्या,दारू अड्डे,गुटखा,वाळू तस्करी करणारे आता पोलीसाच्या सहकार्यांने व्हाईट कॉलर नेते म्हणून वावरू लागले आहेत.त्यापलिकडे जात अवैध धंद्याच्या मिळकतीतून गुंडाराज वाढले आहे.याकडे जिल्हापोलीस प्रमुखांचे पूर्णत:दुर्लक्ष सर्वकाही बिनधास्त,बेधडक सुरू आहे. भविष्यात तालुक्यातील तरूण मटका,जुगारासारख्या अवैध धंद्यामुळे बरबाद झाल्यास,घरे उधवस्त झाल्यास वावगे वाटू नये.

विभागीय कार्यालयाचे कर्मचारी गावोगावी

हप्तेखोरीची इतकी वाईट लागन जत पोलीसांना झाली आहे की,पोलीस ठाण्यावर राहावा म्हणून नेमलेल्या विभागीय पोलीस कार्यालयाचे काही कर्मचारी मटका,जुगारसारख्ये अवैध सुरू आहेत का .? म्हणून गावोगावी पोलीस पाटलांना विचारत फिरत आहेत.मात्र कारवाई केली जात नाही.त्या अवैध धंदे चालकाकाडून लक्ष्मी दर्शनाचा आस्वाद घेतला जात आहे.त्यामुळे अवैध धंदे बंद करायचे कोणी असा गहन प्रश्न उभा टाकला आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.