| शेगावमध्ये किराणा दुकानाला शॉर्टशर्किटने आग | दोन लाखाचा माल जळून खाक |

0

शेगाव,वार्ताहर : शेगाव ता.जत येथील आदीती किराणा स्टोअर्सला शॉर्टसर्किटने आग लागल्याने दोन लाख रूपयाचे  नुकसान झाले.शुक्रवारी रात्री दुकानचे मालक सतिश कोडग दुकान बंद करून घरी गेले होते.दरम्यान संभाजी निकम व बापू निकम किराणा माल घेण्यासाठी दुकानाकडे गेले असताना त्यांना दुकानमधून धूर येत असल्याचे लक्षात आले.त्यांनी दुकानचे मालक सतिश कोडग यांना यांची कल्पना दिली.सतिश तातडीने दुकानजवळ पोहचले,दुकानचा दरवाज्या उघडून त्यांनी व  उपस्थित लोकांनी आतील आग विजवली मात्र तोपर्यत दुकानातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.दुकानातील किराणा साहित्य,फ्रिज असे दोन लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.सुदैवाने निकम दुकानजवळ पोहचल्याने आगीची वेळेत माहिती मिळाल्याने मोठा अनर्थ टळला.

शेगाव ता.जत येथील आदिती किराणा दुकानाला शॉर्टशर्किटने आग लागल्याने मोठे नुकसान झाले.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.