| डफळापूरच्या गँस एजन्सीकडून 100 गँस सिलेंडरचे मोफत वाटप |

0

डफळापूर,वार्ताहर : डफळापूर ता.जत येथील मे.दरेश्वर इण्डेन गँस एजन्सीकडून पंतप्रधान उज्वला गँस योजनेतील पहिल्या 100 कार्ड धारकांना मोफत गँस सिलेंडर,शेगडी,रेगूलेटरचे वाटप करण्यात आले.ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात संरपच बालिकाकाकी चव्हाण यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. 

यावेळी उपसंरपच प्रतापराव चव्हाण,परशुराम चव्हाण सर, ग्रा.प.सदस्य अजित खतीब,दादा चव्हाण, देवदास पाटील,सतिशा चव्हाण,जयश्री बोराड,मालन गडदे,दरेश्वर गँस एजन्सीचे सुभाष चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

डफळापूर येथे इण्डेन गँस एजन्सी सुरू झाली आहे.येथे नवे कनेक्शन, शेगड्या,सह अन्य वस्तूची विक्री सुरू आहे.सांगली रोडनजिकच्या बिंळूर कँनॉलला लागून या एजन्सीचे कार्यालय सुरू झाले आहे.पंतप्रधान उज्वला योजनेतून महिलांना गँस सिलेंडरचे मोफत कनेक्शन सुरू आहे.याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. अल्पवधीत पहिल्या 100 कार्डधारकांना गँस सिलेंडरचे वितरण करण्यात आले.

Rate Card

एजन्सीचे मालक सुभाष चव्हाण म्हणाले,डफळापूर सह परिसरातील गँस वितरणाची जबाबदारी आमच्या एजन्सीला मिळाली आहे.इण्डेन कंपनीचे नवीन कनेक्शन सुरू आहेत.त्याशिवाय शासनाच्या विविध योजनातून गँस सिलेंडरचे वितरण करण्यात येत आहे.डफळापूर सह परिसरातील ग्राहकांना एजन्सीकडून घरपोच सेवा दिली जाणार आहे. त्याशिवाय गँस सिलेंडर कायम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन शेवटी चव्हाण यांनी केले.

डफळापूर ता.जत येथे पंतप्रधान उज्वला गँसचे वितरण करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.