जत | भाजपचे कार्य घराघरात पोहचवा : डॉ.रविंद्र आरळी |

0

 शक्तीप्रमुख,बूथप्रमुखांची बैठक संपन्न

जत,प्रतिनिधी : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध लोकहिताच्या जनकल्याणकारी योंजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची माहिती भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी परिश्रम घ्यावे. पक्षाची ध्येय धोरण,कार्य गावागावात व घराघरांत पोहोचवून पक्षसंघटन

मजबुत करण्यासाठी कार्य करावे.बुथ प्रमुखांना मार्गदर्शन, नवीन सदस्य नोंदणी करावी,आगामी निवडणूकांमध्ये पक्षाला यश मिळवून देवून पक्षाची ताकद जोमाने वाढविण्यासाठी आपली शक्ती केंद्रे व आपआपल्या क्षेत्रातील बुथ मजबुत करुन कार्यकत्यांनी मिशन 2019 च्या कामाला लागावे असे आवाहन भाजपचे नेते पर्यटन महामंडळचे सदस्य डॉ.रविंद्र आरळी यांनी केले.

Rate Card

जत तालुक्यातील बुथ प्रमुखांची डॉ.रविंद्र आरळी शैक्षणिक संकूल येथे बैठक संपन्न झाली.त्यावेळी आरळी बोलत होते.

आरळी म्हणाले,जत तालुक्यात भाजपची ताकत मोठ्या प्रमाणात वाढली आहे.यंदाही विधानसभेला भाजपा विजयी करण्यासाठी पक्षाची महत्वाची ताकत असलेल्या बुथ प्रमुखानी कामाला लागावे,असे आवाहन केले.यावेळी सभापती तम्माणगोंडा रवीपाटील,तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष ममता तेली,शिवाजी ताड,सोमनिंग बोरामणी,संजय तेली,हणमंत गडदे,हेमंत भोसले,श्रीमत सूर्यवंशी, मल्लिकार्जुन केरागोंड,रुद्रगोंड बिरादार आदी मान्यवर उपस्थित होते.200 बुथ प्रमुख उपस्थित होते.

जत येथील बूथ प्रमुखाच्या बैठकीत बोलताना डॉ.रविंद्र आरळी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.