जतेत मटका, अवैद्य वाहतूक खुलेआम

0जत,प्रतिनिधी : ऐतिहासिक भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जत तालुक्यात सध्या जुगार, मटका व अवैद्य वाहतूक खुलेआम चालत असून जत,उमदी पोलिस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.सांगली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक सुहैल शर्मा यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Rate Card

जत तालुक्यात सध्या खूप मोठ्या प्रमाणात जुगार व मटका चालत आहे. याकडे जत,उमदी पोलिस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात चालणारी अवैध वाहतूक, जुगार, मटका यावर कारवाई करत नसल्याचे वास्तव आहे. जत,उमदी पोलीस ठाण्याचे ठाणेदारांचा याला छुपा पांठिबा असल्याने अवैध धंदे चालक सैराट झाले आहेत.यामुळे नागरिकांमधून पोलिस प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.