डफळापूराच्या तीनपानी जुगार अड्ड्यांना जत पोलीसाचा परवाना ?

0
3

वरिष्ठ अधिकाऱ्यांलाच महिन्याकाठी मोठ्या रक्कमेचा हप्ता ?

डफळापूर : येथील बेकायदा अवैध धंदे बंद झाले असताना स्टँडनजिकच्या एका इमारतीत जुगार अड्डा राजरोसपणे सुरु आहे.जतच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांला यांचा थेट हप्ता असल्याने यावर कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. जिल्हा पोलीस प्रमुखच या जुगार अड्ड्याला पायबंध लावू शकतात.

डफळापूर येथे मटका,जुगार अड्डे बंद व्हावेत यासाठी संकेत टाइम्सच्या वतीने मोहिम उघडली आहे.त्याला डफळापूरच्या संरपच बालिकाकाकी चव्हाण यांनी पांठिबा देत बेरोजगार युवक,काही महिलांना वाम मार्गाला लावणारे मटका जुगार अड्डे बंद झाले पाहिजेत अशी भूमिका घेतली आहे.संकेत टाइम्सच्या वृत्तांची दखल घेत डफळापूरातील मटका अड्डे बंद झाले आहेत.मात्र जुगार अड्डे सुरूच आहेत.डफळापूर स्टँड व जिरग्याळ रोडवर असे दोन तिन पानी जुगार अड्डे बेलगामपणे सुरू आहेत.जतचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांला या जुगार अड्ड्याचा महिन्याकाठी मोठा हप्ता असल्याने ते कारवाई करत नाहीत.त्याशिवाय त्यांचे या विभागाचे कर्मचारीही याकडे बघत नाहीत.त्यामुळे जुगार अड्डे चालक परवाना असल्यासारखे दिवसाढवळ्या सार्वजनिक ठिकाणी तीन पानी पत्ते पिसत आहेत.यात खेळणाऱ्या जुगारी कंगाल होताना अड्ड्याचा मालक व पोलीस मालामाल होत आहेत.विशेष पथकांने हे जुगार अड्डे बंद करण्याची कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here