जत | तालुकाभर विषारी शिंदी विक्री,गावागावात दुकाने थाटले |

0

  नागरिकांच्या जिवाला धोका : प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

 

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात विषारी शिंदीची गावागावात बेधडक विक्री केली जात आहे. या विषारी सिंदामुळे अनेकजणांनी मुत्यूला कवटाळले आहे.

जत पूर्व व पश्चिम भागातील गायरान, खासगी मालकीच्या जागेत, वन विभागाच्या झाडाखाली झोपडीवजा दुकाने सुरु करुन तिथे शिंदीची बिनधास्त विक्री केली जात आहे.

Rate Card

पावडर थेट पाणी मिसळून ही शिंदीसदृश

विक्रीचा व्यवसाय बिनबोभाट सुरु आहे.याला संबधित विभागाचा पांठिबा हा महत्वाचा मानला जात आहे. तालुक्यात सिंदीची झाडे कालबाह्य झाले असताना दररोज हाजारो लिटर शिंदी येते कोठून हा संशोधनाचा विषय आहे.सिंदीची विक्रीने अनेक उच्चांक गाठले आहेत. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे घरपोच सेवाही दिली जात आहे.कर्नाटकातून नशा येणारे पावडर मिसळून विषारी सिंदी हंडे, बॅरेल, घागरीने तयार केली जात आहे. 

मातीच्या भांड्यामध्ये शिंदी भरून ठेवलेली असते. शिदीच्या नावाखाली विषारी रसायनयक्त शिंदीची विक्री केली जात आहे. 

यानिमित्ताने तालुक्यातील गावांगावात नशिले क्लोरोहायडॉईड,नवसागर, धोतऱ्याच्या बियांची पावडर व सोझयासह सिंगचा सर्रास वापर केला जात आहे. तालुक्यातील गावागावात विकल्या जाणा-या रसायनयुक्त सिदीला बंळ कुणाचे हाही प्रश्न उपस्थित होत आहे. शिंदीमुळे अनेक बळी गेल्याने विषारी केली जात आहे.शिंदीची झाडे नसतानाही हाजारो लिटर बेकायदा शिंदी येते कोठून हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.याकडे पोलीसांचे दुर्लक्ष कसे काय होत आहे.शिंदीचे झाडे वाळून गेलीआहेत.डफळापूर,

गुगवाड,जालीहाळ,संख,बिंळूर,सह अनेक गावात झाडांची संख्या नसताना सापडलेली शिंदी भेसळची प्रकार उघडकीस आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.