डफळापूरला पाण्याचा टँकर व चारा छावणी सुरू करा : बाबासाहेब माळी

0

डफळापूर : येथे तीव्र पाणी व जनावराच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असून तातडीने टँकर व चारा छावणी सुरू करावी अशी मागणी ग्रा.प.सदस्य बाबासाहेब माळी यांनी केली.तसे निवेदन त्यांनी तहसीलदार,प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

गावात आठ  दिवसआड पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. सध्या पाणी पुरवठा होणारा डफळापूर तलावात पाणी संपले आहे. त्याशिवाय बहुचर्चित असणाऱ्या पेयजल पाणी योजनेचेही बोजवारा उडाला आहे.त्या योजनेच्या माध्यमातून होणारा पाणी पुरवठा बंद आहे.फक्त पाईपलाईन टाकण्यात येत आहे.सध्या पाणी महत्वाचे आहे. त्याशिवाय जनावरांचे चाऱ्याविना हाल होत आहेत. गंभीर दुष्काळात पशुधन शेतकऱ्यांचा आधार बनले आहे.ते टिकावे यासाठी चारा छावणी सुरू करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.

Rate Card

पेयजल पाणी योजना मृगजळ

डफळापूरसाठी दहा वर्षापुर्वी मंजूर झालेली पेयजल योजना मृगजळ ठरली आहे. सध्या योजनेचे काम सुरू आहे. मात्र ज्या बसप्पावाडी तलावातून पाणी सोडले जाणार आहे.पाणी योजनातून तेथे सातत्याने पाणी सोडले जात नाही.परिणामी तलावातच पाणी नसल्याने योजना पुर्ण होऊनतर डफळापूरांना पाणी मिळणार का?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

डफळापूर पेयजल योजनेचे पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र दुसरीकडे महत्वाचे असणारे शुध्दीकरण व टाक्याची कामे रखडली आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.