जत,प्रतिनिधी : जत तालुक्याला वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी सांगोला ते आता थेट मंगळवेढ्यापर्यंत पोहोचवण्याची किमया योजनेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.काम कौतुकास्पद आहे.मात्र देश स्वतंत्र झाल्यापासून सिंचनाचे पाणी मिळावे या मागणीसाठी जत पूर्व भागातील शेतकऱ्यांचा टाहो या प्रशासनाला दिसत नाही एवढे निश्चित झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मताचा जोगवा मागून आपली कटोरी भरणाऱ्यां राजकर्त्याची पाणी मंगळवेढा जात असताना बघ्याची भूमिका दुष्काळ ग्रस्ताच्या जखमेवर मिठ चोळणारी आहे.आता आमच्या संयमाचा बांध फुटला असून म्हैसाळच्या पाण्यासाठी आता आरपारची लढाई सुरू केल्याची माहिती तुकाराम महाराज यांनी संकेत टाइम्सशी बोलताना दिली
तुकाराम महाराज म्हणाले,
जत तालुका कोरडा ठणठणीत अाहे.नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे 80 टँकर तालुक्यात सुरू आहेत.तरीही कॅनल पूर्ण असलेल्या गावा पाणी दिले जात नाही. मात्र 167 किलोमीटरवरील मंगळवेढा तालुक्यात म्हैसाळचे पाणी नेण्यात आले आहे. हा कुठला न्याय आहे.भारत देश स्वतंत्र झाल्यापासून पुर्व भाग पिण्यासाठी पाणी मागतोय त्यांना पाणी दिले जात नाही.ज्या टँकरद्वारे दरवर्षी अपुरे पाणी पुरविले जाते. डफळापुर बिळूर परिसरात कँनल पुर्ण अाहेत.शेतकऱ्यांची पाणी मागणी असतानाही पाणी दिले जात नाही.अशा निष्ठुर प्रशासनाला जाग आणण्याची आता वेळ आली असून जत ते विधानसभा पायी दिंडीने शेतकऱ्याची आक्रमकता सरकारला दाखवणार आहोत. त्याशिवाय जत पूर्व भागात जोपर्यंत सिंचनाचे पाणी येत नाही,तोपर्यंत तीव्र आंदोलन पुकारले आहे.असेही शेवटी तुकाराम महाराजांनी सांगितले.