सांगली जिल्ह्यात रिपाई संजय पाटील यांना मताधिक्य देणार – संजय कांबळे

0

जत,प्रतिनिधी : महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांना सांगली जिल्ह्यातून रिपाई(आठवले गट)मोठ्या मताधिक्क्याने विजयी करणार असल्याची माहिती रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी दिली. 

ते जत बेवनूर,कुणिकोणूर,निगडी खुर्द,येळदरी, प्रतापूर गुळवंची,माडग्याळ,मेंढीगिरी,सिंदूर, बिळूर येथील मतदारांशी संवाद दोऱ्या बोलत होते.यावेळी तालुका यावेळी रिपाईचे तालुका अध्यक्ष संजय कांबळे-पाटील,संजय विलास कांबळे, सुभाष कांबळे,प्रशांत ऐदाले,अवधूत शिंदे,सोमनाथ कांबळे,विनोद कांबळे उपस्थित होते.

Rate Card

यावेळी संजय कांबळे म्हणाले,सांगली जिल्ह्यातील रिपाई (आठवले गटाची) मोठी ताकद असून ही ताकद उमेदवार संजय पाटील यांच्या मागे उभी केलेली आहे.राज्यात भाजप-शिवसेना बरोबर युती रिपाइची आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक गावात महायुतीला चांगला  प्रतिसाद मिळाला आहे.खासदार संजय पाटील यांनी गेल्या पाच वर्षात तालुक्यातील बहुतांशी पाणी प्रश्न व विविध विकास कामे केलेली आहेत.त्यामुळे खासदार संजय पाटील यांचा विजय निश्चित आहे.रिपाईच्या सर्व कार्यकर्ते,मतदारांनी संजयकाकांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन शेवटी कांबळे यांनी केले.

खा.संजयकाका पाटील प्रचारार्थ रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांची मतदारांनी संवाद साधला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.