संख,वार्ताहर :आंबेडकरी चळवळ ही स्वाभीमानाची चळवळ आहे.डॉ.बाबासाहेब आंबेकडरांनी आम्हाला स्वाभीमान,आत्मसन्मानाने जगण्याचा संदेश दिला. बहुजन समाजासाठी तसेच देशासाठी त्यांनी केलेले काम लाखमोलाचे आहे. बाबासाहेंबाचे कार्य पूढे नेण्यासाठी आज खरी गरज आहे निष्ठेची…असे प्रतिपादन डॉ.भाऊसाहेब पवार यांनी केले.
संख ता.जत येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ.पवार यांच्या हस्ते प्रांरभी डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जयंती उत्सव समितीचे राकेश कांबळे,विक्रम कांबळे, हनुमंत कांबळे,अमर कांबळे,अशोक विटेकर,रमाबाई कांबळे,पार्वती कांबळे,पत्रकार रियाज जमादार आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.पवार म्हणाले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या संघर्ष मुळे सामान्य जनतेला न्याय मिळाला आहे.भारताच्या बहुमोल परिवर्तनात डॉ.आंबेडकर यांनी केलेले कार्य प्रेरणादायक आहे.त्यांच्या कार्याचे स्मरण करून उज्वल जीवन जगावे.
संख येथे 30 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जंयतीचा मुख्य कार्यक्रम होणार आहे.
संख ता.जत येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.