जत,प्रतिनिधी : वायफळ (ता.जत) येथे विहिरीतील काम करणारा मजूर चक्कर येऊन विहिरीत पडल्याने जागीच मुत्यू झाला.
प्रशांत बाबासाहेब यादव (वय-26,रा. वायफळ) असे मृत तरुण मजूराचे नाव आहे. गुरुवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान घटना घडली.याबाबत जत पोलिस ठाण्यात वायफळ गावच्या पोलीस पाटील सुजाता एकनाथ सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे.
जत पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी,वायफळ येथील शेतकरी बाबूलाल मोला शेख यांच्या विहिरीतील गाळ काढण्याचे काम गेल्या काही दिवसापासून सुरू होते.गुरूवारी सकाळी प्रशांत यादव विहिरीच्या कडेला काम करत होता.अचानक त्याला चक्कर आल्याने तो विहिरीमध्ये कोसळला.त्यात प्रशांतच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावरून इतर मजूरांनी त्याला तात्काळ जत येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.मात्र तोपर्यत रक्तस्राव झाल्याने त्यांचा मुत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.अधिक तपास जत पोलीस करत आहेत.