जत | शहरात तब्बल 222 पोलीसाचा रुट मार्च |

0

जत,प्रतिनिधी : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या आदेशावरून जत पोलीस व महसूल विभागाच्या वतीने जत शहरात शनिवारी भव्य रुट मार्च काढण्यात आला.या रुट मार्च मध्ये डिवायएसपी दिलीप जगदाळे,तहसीलदार सचिन पाटील,पो.नि.शिवाजी गायकवाड यांच्यासह जत उपविभागातील अधिकारी, कर्मचारी,आरपीपी,क्यूआरटी,आरपीएफ पथकातील 18 अधिकारी,204 कर्मचारी 13 वाहने सामील झाली होती.जत शहरातील प्रमुख मार्गावरून हा रुट मार्च काढण्यात आला. लोकसभा निवडणूकीत कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावे.पोलीस व प्रशासन कोणत्याही परिस्थितीला सज्ज असल्याचा संदेश या निमित्ताने तालुकाभर पोहचावा यासाठी या रुटमार्चचे आयोजन केले होते.

Rate Card

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जत विभागीय अधिकारी कार्यालयाअतर्गंत जत शहरात रुट मार्च काढण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.