वळसंगजवळील भिषण अपघातात शाळकरी मुलगा ठार

0

वळसंग,वार्ताहर : वळसंग-माडग्याळ रस्त्यावर आयशर टँम्पो व दुचाकीचा अपघात समोरासमोर धडक होऊन शाळकरी मुलगा ठार झाला.संतोष विजयकुमार कोळी(वय-16,रा.वळसंग)ठार झालेल्या मुलाचे नाव आहे.घटना गुरूवारी दुपारी घडली.

अधिक माहिती अशी,संतोष कोळी हा एमएच-10,जे-2809 या दुचाकीवरून वळसंगकडे येत होता.आयशर टँम्पो क्र.एमएच-10,एडब्लू-7688

Rate Card

जतकडून भरधाव वेगाने माडग्याळ कडे निघाला होता.वळसंग पासून 3 किलोमीटर अंतरावर दुचाकी व आयशरची समोरासमोर भिषण धडक झाली.त्यात दुचाकीवरील संतोष कोळी यांच्या डोक्यावरून आयशरचे चाक गेल्याने डोके चक्काचूर झाले.तातडीने संतोषला उपचार्थ जतकडे रवाना केले मात्र वाटेत रक्तस्राव झाल्याने मुत्यू झाला.संतोष दहावीच्या वर्गात शिकत होता.नुकतीच त्यांने दहावीची परिक्षा दिली आहे.मनमिळावू व सतत हसतमुख संतोषच्या अपघाती मुत्यूने वळसंग परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शवविच्छेदनानंतर शोकाकूल वातावरणात त्यांच्या मृत्तदेहावर अत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान धडक दिल्यानंतर आयशर चालक पळून गेला आहे. जत पोलीसात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.आयशर चालकांचा शोध सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.