जत,प्रतिनिधी : भाजपचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य तथा स्ञीरोग तज्ञ डॉ.रवींद्र आरळी यांची महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळावर शासन नियुक्त सदस्य म्हणून निवड करण्यात आली.निवडीबद्दल डॉ.आरळी यांचा सत्कार करण्यात आला.गेल्या 25 वर्षापासून जत भाजपची धुरा प्रभावीपणे पेलत आहेत.भाजपच्या सध्याच्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे. डॉ.आरळी यांच्या या कामाची पक्षाने दखल घेत त्यांना पर्यटन विकास महामंडळावर शासन नियुक्त सदस्यपदी निवड केली आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या नावाची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
डॉ.आरळी यांचा निवडीबद्दल जत तालुका भाजपच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी जि.प.सभापती तम्मणगौंडा रवी-पाटील,माजी आमदार मधुकर कांबळे,तालुकाध्यक्ष चंद्रकात गुड्डोडगी,सोमनिंग बोरामणी,रामाण्णा जिवण्णावर,नागनगौडा पाटील,शिवाजीराव ताड आदी मान्यवर उपस्थित होते.
जत : डॉ.रवींद्र आरळी यांचा पर्यटन विकास महामंडळ सदस्यपदी निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.