जत तालुक्यातील उद्योग क्षेत्रात ग्रामीण भागात पँकेज्ड ड्रिकिंग वॉटरचा अद्यावत प्लांट उभा करून युवा उद्योजक डॉ.जगताप यांनी ग्रामीण भागात उद्योग व्यवसाय उभा राहू शकणार नाही.हा विचार बदलवत उद्योग समुहाची मुर्हर्तमेढ रोवली आहे.जिव्हाळा उद्योग समुहातील हा महत्वाचा अत्याधुनिक पँकेज्ड ड्रिकिंग वॉटर प्लँट सुरू झाला आहे. दुष्काळी तालुक्यात परिवर्तनाचा पाया डॉ.जगताप यांनी या उद्योगाच्या माध्यमातून घातला आहे.यापुर्वीही जिव्हाळा उद्योग समुहातील पतसंस्था,हौसिंग सोसायट्या कट्रक्शन उद्योग यशाची वेगवेगळी क्षेत्रे पदाक्रांत करत आहेत.त्यात नव्या उद्योगाची भर पडली आहे.जिल्ह्यात काही बोटावर मोजण्याऐवढ्या आसणाऱ्या आयएसआय प्रमाणपत्र प्राप्त शुध्द पाण्याचा हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. जत सारख्या दुर्लक्षित व दुष्काळी तालुक्याला यामुळे नावलौकिक मिळाला आहे.तालुक्यातील रामपूर येथे हा पहिला आयएसओ मानांकित वाटर प्लांटमध्ये पुर्ण क्षमतेने सुरूवात करण्यात आली आहे. दोन एकर जागेत या उद्योगाच्या अत्यानुधिक मशनिरी बसविण्यात आल्या आहेत.बॉटल तयार करून बॉक्स भरेपर्यत सर्व मशिनरीद्वारे येथे केले जाते.पाणी तपासणीसाठी वातानुकूलित दोन लँब निर्माण करण्यात आल्या आहेत.बॉटलमध्ये पाणी भरण्याअगोदर येथे पाण्याची तपासणी करण्यात येते.अत्यंत काटेकोरपणे पाणी तपासणी होऊन अत्याधुनिक मशिनमध्ये शुद्ध पाणी करून बॉटलमध्ये भरण्यात येते.बॉटल तयार करण्यापासून पाणी शुध्दीकरण,बॉटल धुणे,पाणी भरणे,स्टिकर लावण्यापर्यतची कामे मशिनद्वारे केली जातात.अशा या प्लांटची सर्व अत्याधुनिक यंत्रणा तालुक्यातील उद्योग क्षेत्राला उभारी देणारी ठरली आहे.
शासनाचे शुद्धतेचे सर्व मानांकन या प्लांटने मिळवले आहेत. तालुक्यात आतापर्यंतच्या इतिहासात पहिला शुद्ध पाण्याचा पॅकेज ड्रिंकिंग वॉटर प्लांट सुरू करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यातील छोट्या उद्योजकांना अर्धा, एक लिटर, वीस लिटरचे शुद्ध पाण्याच्या बॉटल माफक दरात विक्कीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. तालुक्यात या जिव्हाळा बॉटलची दररोज 2000 बॉक्सची विक्री सध्या सुरू आहे. प्लांटची दररोज 17000 बॉटल निर्मितीची क्षमता आहे.सध्या दररोज दहा हजार बॉटल तयार केल्या जात आहेत. सर्व प्रक्रिया अत्याधुनिक मशीनद्वारे केले जाते. तासाला एक हजार बॉटल बोईंग मशीन मधून तयार होत आहेत.यामुळे आसपासच्या सुमारे वीज कामगारांना प्रत्यक्षात रोजगार मिळाला आहे.यापुढेही या उद्योगाचा मोठा विस्तार करायचा असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.सध्या जत, कवठेमहांकाळ,सांगोला,अथणी आदी तालुक्यात प्राथमिक या बॉटल उत्पादनाची विक्री सुरू आहे.या उद्योगाचे उत्पादन सुरू झाल्यापासून ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.दररोज मोठ्या प्रमाणात बॉटलची विक्री सुरू आहे.दर्जा,शुद्धता,स्वच्छता,ग्