जत | ट्रकचोरीचा छडा | संशयित चालकाला 26 पर्यत पोलीस कस्टडी |

0

 लोंखडी कॉईलसह ट्रक मोहोळ येथे पकडला

जत,प्रतिनिधी :जत शहरातून ट्रान्सपोर्टसाठी वाहतूक करणाऱ्या 

ट्रक चोरीचा छडा अखेर चौथ्या दिवशी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने लावला.लोंखडी कॉईल भरलेल्या चोरीच्या ट्रकसह आरोपीच्या मुसक्या आवळल्या.याप्रकरणी संशयित आरोपी चालक धनंजय तानाजी काळे,(रा.खडकद ता.आष्टी जि.बीड)याला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता 26 मार्च पर्यत न्यायालयाने पोलीस कस्टडी सुनावली.

अधिक माहिती अशी,जत शहरातील हणमंत माळी यांच्या मालकीचा भारत ब्रेझ कंपनीचा ट्रक क्र.एमएच-28,डी-3592 हा

बल्लारी(कर्नाटक)येथून जिंदाल कंपनीच्या लोंखडी कॉईलची वाहतूक करतो.बल्लारी येथून सनसवाडी (पुणे)येथे लोंखडी कॉईल उतरण्यात येतात.गेल्या अनेक महिन्यापासून हा ट्रक या मार्गावरून कॉईलची वाहतूक करत आहे.गेल्या दोन महिन्यापासून ट्रकवर चालक धनंजय काळे कामास होता.मालकाचा विश्वास संपादन करत काळे यांने जत येथे माल भरून आलेला ट्रक पुणे येथे माल उतरतो म्हणून ता.6 मार्चला पळविला होता.तेव्हापासून चालक काळे व ट्रक गायब होता.याबाबत मालक माळी यांनी 21 मार्चला जत पोलीसात ट्रक चोरीची फिर्याद दिली होती.त्या अनुषगांने जत पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई करत चालक काळे यांच्या बहिणीचे गाव असलेल्या

Rate Card

कोबडवाडी ता. मोहोळ जि.सोलापूर येथे छापा मारत संशयित आरोपीसह ट्रक मुद्देमालासह जप्त केला.संशयित आरोपीला रविवारी जत न्यायालयात उभे केले,असता न्यायालयाने ता.26 मार्चपर्यत पोलीस कस्टडी सुनावली.दरम्यान घटनेचा वेगवान तपास करत जत पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ट्रक चोरीचा छडा लावल्याने माळी कुंटुबियाकडून समाधान व्यक्त होत आहे.अधिक तपास सा.पोलीस निरिक्षक अनिल माने करत आहेत.

 चोरी झालेला ट्रकसह लोंखडी काईल पोलीसांनी ताब्यात घेतल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.