जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात यंदाच्या द्राक्षहंगामात यंदाची उलाढाल पाचशे कोटींवर पोहोचली आहे. हंगाम भरात असून द्राक्ष काढणी व बेदाणा निर्मिती वेगाने सुरू आहे. सुमारे चाळीस टक्के द्राक्षे बेदाण्यासाठी वापरण्यात आली आहेत. उर्वरीत द्राक्षे खुल्या बाजारात दलालांना देण्यात आली आहेत. द्राक्षाच्या उच्चांकासाठी पुर्व,दक्षिण भागात आलेल्या म्हैसाळ योजनेच्या पाण्यालाही श्रेय द्यावे लागेल.तालुक्यातील 50 गावांत यंदा सुमारे 8 हजार हेक्टरमध्ये द्राक्षे घेण्यात आली. 15 हजार शेतकर्यांनी बागा फुलवल्या. सर्वाधिक म्हणजे द्राक्षबागायत बिंळूर,डफळापूरमध्ये आहे. द्राक्ष बेदाणा ऐवजी मार्केटिंगसाठी द्राक्ष निर्मितीकडे शेतकरी वळले. द्राक्ष विक्री आणि बेदाणा याद्वारे मिरज तालुक्याने यंदाच्या हंगामात सुमारे 500 रुपयांची थेट उलाढाल आतापर्यंत केली. द्राक्षशेतीचा रोजगार, औषधे, बेदाणानिर्मितीद्वारे उपलब्ध झालेला रोजगार, वाहतूक आणि व्यापार यामुळे झालेली उलाढाल वेगळीच आहे.कामगार टंचाईमुळे शेतमजुरीचे दर चारशे – पाचशे रुपयांपर्यंत गेले आहेत. अन्य हंगामी पिके घेणार्या गरीब शेतकर्यांना वाढ असह्य आहे. शेतीसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. द्राक्षक्षेत्र वाढू लागल्याने अन्य दरवाढ होऊ लागली असून जनावरांसाठीच्या कडब्याचे दरही 2 हजार रुपये शेकडा इतके झाले आहेत.
म्हैसाळच्या पाण्याचे उपकार
द्राक्षशेतीला यंदाही म्हैसाळ प्रकल्पाच्या पाण्याने तारले. द्राक्ष पट्ट्यातील डफळापूर, बाज,अंकले,कुंभारी,शेगाव,जत बनाळी या गावांसाठी योजना उपकारक ठरली आहे.संख,दरिबडी,सिध्दनाथ,उमदी,
यंदा द्राक्ष शेतकर्यांना दराने मारले आहे. गतवर्षी 240 रुपये असणारा दर यंदा 160 रुपयांपर्यंत आतातर 100 रूपयापर्यत घसरला आहे. द्राक्षाचे वाढलेले उत्पन्न, लांबलेली थंडी, शेतकर्यांचा बेदाण्याऐवजी द्राक्षविक्रीकडे कल यामुळे दराने मार खाल्ला. यंदा थंडीने अगदी मार्च सुरू होईपर्यंत ठिय्या मारला होता; त्यामुळे बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई, मुंबई, दिल्ली या हुकमी बाजारपेठांतून लवकर मागणी आलीच नाही. दर घसरल्याने शेतकर्यांना बेदाणानिर्मितीला पसंती दिली आहे.