जत | शहरात पुन्हा तीन दुकाने फोडली,चोरीसत्र संपेना |

0

पोलीसाची हतबलता,चोरट्याचे धाडस,नागरिकांत भिती

जत,प्रतिनिधी जत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी पुन्हा चोरीचा प्रयत्न झाला. शहरात सुरू असलेले चोरी सत्र नव्याने सुरू झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शनिवारी जत शहरातील सोनलकर चौक सातारा रोड या मध्यवर्ती भागातील चार दुकाने फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.एका ठिकाणी चोरट्यांना रोकणाऱ्या सुरक्षारक्षकावर दगडफेक केली. याबाबत रखडलेले चोऱ्यांचे तपास व चोरीच्या रक्कमा कमी असल्याने पोलिसात कोणताही गुन्हा रात्री उशिरापर्यंत दाखल नव्हता.शहरातील सोनलकर चौक येथील ओंकार बेकरी या दुकानाचे कटावणीच्या साहाय्याने स्वेटर उचलून दुकानात प्रवेश करत चार हजार रुपये रोख,एलईडी टीव्ही असा 12 हाजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवली.हे चोरटे या दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्याच्या शेजारील सिद्धनाथ मोबाईल शॉपी या दुकानाचे कटावणीने शटर उचलून आत प्रवेश करत किंमती मोबाईल चोरट्यांनी पळवले. त्याची सुमारे 50 हजार रुपये किंमत होते. त्याशिवाय सातारा रोडवरील आदिनाथ ट्रेडर्स हे दुकान फोडून चोरट्याने आत प्रवेश केला मात्र आतमध्ये जनावराची पेंड असल्याचे लक्षात आल्याने तेथून खाली हात पळ काढला. त्याचबरोबर सातारा रोडवरील नदाफ मंगल कार्यालय शेजारील एक टायर दुकान फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला.मात्र नदाफ मंगल कार्यालयाचा  सुरक्षा गार्डने हटकल्याने चोरट्यांनी पलायन केले.मात्र जाताजात सुरक्षा गार्डवर चोरट्यांनी दगडफेक केली. तसेच पुढे मोरे कॉलनी येथे चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला.मात्र नागरिकाने पोलिसांना कळल्याने पोलीस आल्याचा कुणकुण लागल्याने चोरट्यांनी तेथून धूम ठोकली.यात कोणत्याही घरात चोरी झाली नाही.त्यामुळे चोरीच्या रक्कमा कमी आहेत.मात्र चोरट्याचे धाडस दिवसेदिवस वाढत आहे. या प्रकाराने शहरातील चोर्‍यांचे सत्र नव्याने सुरू झाले.दोन-चार दिवसा आड शहरातली चार ते पाच दुकाने फोडली जातात.पोलिसांची सक्षम यंत्रणा असतानाही,पोलीस स्टेशन शहरात असूनही चोरटे शहरात चोऱ्या करत आहेत.

Rate Card

आजपर्यत पन्नासभर शहरात छोट्यामोठ्या चोऱ्या झाल्या आहे.काही चोऱ्या पोलीसात नोंद आहेत.मात्र शहरातील अपवाद वगळता या चोऱ्यांचा तपास अद्यापपर्यत लागलेला नाही.त्यामुळे व्यवसायिक,नागरिक चोऱ्यांचा गुन्हा दाखल करण्यास टाळटाळ करत आहेत.त्यामुळे पोलीसाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

जत शहरात सोनलकर चौकातील दुकानाचे चोरट्याने शटरचे केलेले नुकसान

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.