जत | संतप्त नगरसेवकांने ठोकले जत पालिकेला टाळे |

0

जत,प्रतिनिधी : जत नगरपालिकेच्या विकास कामावरून मुख्याधिकारी अभिजित हराळे व स्वच्छता सभापती लक्ष्मण एडके यांच्यात वाद झाला.मुख्याधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधात संतप्त नगरसेवक एडके यांनी पालिका कार्यालयाला टाळे  ठोकत दरवाज्यासमोर ठिय्या मांडला.पोलीसांनी हस्तक्षेप करत टाळे काढले.

Rate Card

जत पालिकेच्या कारभार सतत वादग्रस्त असतो.कोणत्याही कारणावरून अधिकारी,सत्ताधारी,व विरोधक नगरसेवकांत वादावादी ठरलेली असते.सोमवारी असाच प्रकार घडला.पालिकेचे स्वच्छता सभापती एडके काही कर्मचाऱ्यांशी चर्चा करून मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात गेले.तेथे त्याच्यात चर्चा झाली.काही कामावरून  त्यांच्यात वाद झाला.सभापती व मुख्याधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका वाद विकोपाला गेला.संतप्त सभापती एडके यांनी समर्थकांना बोलवून मुख्य गेटला कुलूप ठोकत पायरीवर ठिय्या मांडला.या प्रकरणाची शहरात जोरदार चर्चा सुरू होती.दरम्यान मुख्याधिकारी अभिजित हराळे हे सत्ताधाऱ्यांना विचारात न घेता कामे करतात.कोणत्याही विषयावर गंभीर नाहीत.त्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याची प्रतिक्रिया सभापती एडके यांनी दिली.तर मुख्याधिकारी हराळे म्हणाले,सभापती टिमू एडके यांचे आरोप बिनबुडाचे आहेत.सभागृहात ठरल्याप्रमाणे कामे होतात.सध्या लोकसभा निवडणूकीचे काम सुरू आहे.ते कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देत आहेत.मी प्रामाणिक काम करत आहे

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.