जत | तहसील कार्यालय अतिक्रमणाच्या विळाख्यात |

0

जत,प्रतिनिधी : जत तहसील कार्यालय आवार पुन्हा अतिक्रमणांने वेढला आहे.दररोज खोकी धारकांचे रस्त्यापर्यंत अतिक्रमण होत आहे.तहशील कार्यालयाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात बेकायदा खोकी टाकण्यात आली आहेत.शहरातील महत्त्वाची कार्यालये असणाऱ्या जत तहसील,पंचायत समिती,कोर्ट प्रांतकार्यालय परिसरातील रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात चहा, वडापाव,थंडपेयाचे स्टॉल थाटण्यात आले आहेत.यामुळे वाहतुकीला अडचणीचे परत आहे. त्याशिवाय कार्यालयाच्या सुंदरतेला यामुळे बाधा पोहोचत आहे.अशा खेती, स्टॉल समोर रस्त्यावरच दुचाकी लावल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. गतवर्षी बांधकाम विभागाने काढलेल्या अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात खोकी हटविण्यात आली होती.मात्र अतिक्रमण हटाव मोहीम थंडावल़्याने थेट रस्त्यापर्यंत स्टॉल मांडण्यात आले आहेत.त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.